Japan Prison Food Video : तुरुंगात जाण्याची भीती सर्वांनाच आहे. शिक्षेसाठी एखादा व्यक्ती तुरुंगात गेला असे कानावर पडले तरी अंधारलेली चार भिंतींची कोठडी आपल्या डोळ्यासमोर येते, ज्यात नीट झोप किंवा जेवायलाही नाही. सर्वत्र अस्वच्छता, आजारी पडलो तर कुणी विचारणार नाही. अन्न म्हणजे जणू काही स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच खायला दिले जात आहे. तुरुंगातील जीवन म्हणजे एक प्रकारे नरक असे वाटू लागते, तुरुंगाबद्दल असाच समज लोकांचा असतो. मात्र, सोशल मीडियावर एका तुरुंगातील असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की हा तुरुंग आहे की फाइव्ह स्टार हॉटेल असा प्रश्न पडेल. कारण या ठिकाणी कैद्यांना असे काही जेवण दिले जाते जे पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.

तुरुंगातील कॅन्टीनचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुरुंगातील कैद्यांचे कॅन्टीन दिसत आहे. हे पाहिल्यानंतर तुरुंगाबद्दलच्या तुमच्या सर्व कल्पना बदलतील. इतकेच नाही तर तुम्हालाही या तुरुंगाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल. हा व्हिडीओ जपानमधील तुरुंगातील असल्याचा दावा केला जात आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

तुरुंगात कैद्यांना दिले जाते फाइव्ह स्टार हॉटेलसारखे जेवण

या कारागृहातील कैद्यांना इतके स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण दिले जाते की पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या कैद्यांचे जेवण तुम्हाला 5 स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा कमी वाटणार नाही. तुरुंगात एवढे पौष्टिक आणि चविष्ट अन्न तुम्ही क्वचितच पाहिले असेल आणि इतकेच काय, ते इतक्या स्वच्छतेने बनवले जात आहे, जणू काही खरंच एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवले जात आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, तिथे काम करणारे लोक आधी तुरुंगातील कैद्यांच्या किचनमध्ये आल्यानंतर एक तुरुंग अधिकारी त्या सर्व शेफचे कपडे, केस आणि नखे काळजीपूर्वक तपासत आहेत. तपास संपल्यानंतर सर्व शेफ कामावर रुजू होतात. यातील काही शेफ भाज्या अगदी व्यवस्थित कापत आहेत, तर काही तांदूळ धूत नंतर तो शिजवून घेत आहेत. काही जण चिकन तळत आहेत. काही तयार जेवण पॅक करत आहेत. विशेष बाब म्हणजे जेवण पॅक करताना त्याचे वजनही केले जात आहे. याशिवाय काही शेफ कैद्यांच्या जेवणाच्या थाळी पॅकिंगसाठी नीट भरत आहेत. कैद्याच्या जेवणाच्या थाळीमध्ये खाण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ देण्यात आले आहेत. सर्व थाळ्या व्यवस्थित पॅक केल्यानंतर एका स्टोअरमध्ये ठेवल्या जात आहेत. यानंतर कैद्यांना हे जेवण देण्यापूर्वी तुरुंगातील अधिकारी जेवणाची कसून तपासणी करतो.

More News On Trending : “शिस्तीत राहा नाहीतर…” भरविमानात एअर होस्टेसची प्रवाशांना दादागिरी; Video पाहून युजर्सचा संताप

जपानी तुरुंगात कैद्यांना दिले जाणारे जेवण पाहून आता लोकांना धक्का बसला आहे. तुरुंगातील जेवण इतके चांगले असू शकते हे जाणून बरेच लोक थक्क झाले आहेत. खरे तर जपानी संस्कृतीत अन्नाला खूप महत्त्व दिले जाते, त्यामुळे तिथल्या तुरुंगातही कैद्यांना चांगले जेवण मिळते. जपानमध्ये कैद्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

अनेक जण या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तुरुंगात गेले पाहिजे, जेणेकरून असे जेवण खायला मिळेल, असे काही लोक गमतीने म्हणत आहेत. त्याच वेळी, जपानमधील कैद्यांच्या सुधारणेकडे किती लक्ष दिले जाते हे पाहून काही लोक प्रभावित झाले आहेत. मात्र, हे सर्व एकाच तुरुंगामध्ये होते की काही निवडक तुरुंगांमध्येच होते, असा प्रश्नही काही लोकांनी उपस्थित केला आहे. एकूणच ही बातमी लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.