Viral video: दरवर्षी रस्ते अपघातात लाखो जीव जातात. वाहने रस्त्यावर असतील तर अपघात होणे स्वाभाविक आहे. अपघात हे सांगून होत नसतात, परंतु ते टाळण्यासाठी खबरदारी घेणं आपल्या हातात नक्कीच आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये अपघात टाळण्यासाठी ट्रक ड्रायव्हरनं एक भन्नाट जुगाड केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ट्रक ड्रायव्हरने रस्ते अपघात रोखण्यासाठी असा मार्ग शोधला ज्यामुळे संपूर्ण जग त्याचं फॅन झालं आहे.ट्रकमध्ये काहीतरी सामान आहे, यावेळी ट्रकच्या मागून येणाऱ्या गाडीतून हा व्हिडीओ काढला आहे. ट्रकच्या मागे एक लेझर लाइट बसवली आहे. ज्याचा प्रकाश रस्त्यावर पडतो आहे. ट्रकच्या आसपास एक रिंगण तयार झालं आहे. या रिंगणाच्या काही अंतर पुढे ट्रक आणि काही अंतर मागे दुसरी गाडी आहे. ट्रकच्या मागे असलेली गाडी या लेझर लाइटच्या हिरव्या प्रकाशाजवळ बिलकुल जात नाही आहे. त्यापासून काही अंतर लांबच आहे.यामुळे स्वतःचा आणि दुसऱ्यांचाही जीव वाचेल. हा जुगाड पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत आणि या ड्रायव्हरचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: बैलगाडा शर्यत आली अंगलट! बैलानं थेट प्रेक्षकांवरच घेतली उडी; अनेक जण जखमी
एरवी तुम्ही पाहिलं असेल, अशा स्थितीत मागील गाडी पुढील गाडीला ओव्हरटेक करून निघून जाते. पण इथं मात्र तसं घडताना दिसत नाही. लेझर लाइटमुळे मागच्या गाडीने ट्रकला बिलकुल ओव्हरटेक केलं नाही. ही लेझर लाईन इतर वाहनांना ट्रकला ओव्हरटेक न करण्याची आणि ठराविक अंतर राखून त्याचं पालन करण्याची सूचना आहे.
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.@whitebase1 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.