पाणीपुरी हे नुसते नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी आवडत नाही असा खवय्या मिळणं तसं दुर्मीळच. पाणीपुरी, गुपचूप, गोलगप्पे अशा विविध नावाने ओळखला जाणारे पाणीपुरीचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही काय अगदी बडे बडे नेतेही पाणीपुरी खाण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाणीपुरी खाल्ली होती. जपानच्या राजदूतांनी मोदींना पाणीपुरी खाताना पाहिलं आणि त्यांनाही राहवलं नाही. त्यानंतर त्यांनी जे केलं ते थक्क करणारं आहे. याचा व्हिडीओही त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत पाणीपुरीचा आस्वाद घेतला होता. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो जपानचे राजदूत हिरोशी सुझिका यांनी पाहिले आणि त्यांनाही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता ते पुरेपूर पणीपुरीचा आनंद घेत आहेत. तसेत आणखी काही चाट सुद्धा त्यांनी ट्राय केले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: नातवाला मारलं म्हणून सुनेची सासूला बेदम मारहाण, मुलगा मात्र व्हिडीओ बनवण्यात व्यस्त
हिरोशी सुझुकीने ट्विटमध्ये म्हणाले, जेव्हापासून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान किशिदा यांना एकत्र गोलगप्प्यांचा आनंद घेताना पाहिले तेव्हापासून मलाही त्याचा आनंद घ्यावासा वाटत होता. काशीमध्ये झालेल्या भव्य स्वागताबद्दल त्यांनी सर्व भारतीयांचे आभारही मानले.