महाराष्ट्रात लग्न म्हटलं की वेगळंच थाट असतो. या महाराष्ट्रीन लग्नात जर नवरी जपानची असेल तर…..हे दृश्य फार वेगळेच असेल होय ना. सोशल मीडियावर अशाच एका जपानी नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महाराष्ट्रीयन वेषभुषेतील नवरी मराठमोळ्या अंदाजमध्ये दिसत आहे. ढोल ताशाच्या तालवर थिरकणाऱ्या या नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये एक जपानी तरुणी महाराष्ट्रीयन वधूच्या पोशाखात ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचताना दिसत आहे. महाराष्ट्रीयन वधूप्रमाणेच या जपानी तरुणीने पांरपारीक नऊवारी साडी नेसली आहे, पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने परिधान कले आहेत, मुंडवळ्या बांधल्या आहेत. नवरीच्या वेशात तरुणी अतिशय सुंदर दिसत आहे. ढोल ताशाच्या नाद ऐकून तीही स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकली नाही. ठेक्यावर तिला नाचताना पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हिडीओमध्ये मराठमोळ्या वेशभुषेतील नवरदेवही दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे “झक्कास नवरी”
आणखी एका व्हिडीओमध्ये महाराष्ट्रीन पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये जपानी तरुणीचे आई-वडीलही महाराष्ट्रीय पोशाखात दिसत आहे. जपानी नवरीच्या आईने साडी नेसली आहे तर वडीलांनी कुर्ता – पायजमा आणि त्यावर नेहरू जॅकेट परिधान केले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खऱ्या प्रेमाला कोणतीही सीमा नसते याचा हा पुरावा आहे.”
सोशल मीडियावर दोन्ही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एकाने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की,”किती भारी दिसतेय नवरी महाराष्ट्रीयन संस्कृतीत. महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती एवढी छान आहे परदेशातील लोकांना भुरळ पाडतेय.” दुसऱ्याने लिहिले की, “खुप भारी दिसते” तिसऱ्याने लिहिले की, “ती खूप गोड दिसते आहे.” चौथ्याने लिहिले की, “ती खूप आनंदी आहे.”
आणखी एकाने लिहिले की, “प्रेम असावं तर असं ज्यात रूप , जात , धर्म , वागण न बघता मन जपणारा जोडीदार असावा जो प्रत्येकाच्या नशिबी नसतो”
एकाने मजेशीर शैलीत लिहिले, “जॅपनीज वहिणी भारतामध्ये स्वागत आहे.”