अनेक लहान मुलांना शाळेत जायला आवडतं नाही. अशा मुलांना जर कोणी असा पर्याय दिला की तुमच्या ऐवजी दुसरे काणी शाळेत जाऊ शकते तर त्यांना नक्कीच ही कल्पना आवडेल. पण हे कसं शक्य आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या ऐवजी दुसरा कोणी कसा काय शाळेत जाऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, जपानमध्ये लवकरच असा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांऐवजी शाळेमध्ये रोबो हजेरी लावणार आहे आणि विद्यार्थी घरबसल्या शाळेत काय शिकवले जात याची माहिती मिळवू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टॅब्लेटच्या मदतीने रोबोवर नियंत्रण केले जाईल

जपानमधील एका शाळेने विद्यार्थी गैरहजर असताना त्यांच्या जागी रोबोट्स वापरण्याची योजना आखली आहे जेणेकरून रोबोच्या मदतीने गैरहजर विद्यार्थीघरबसल्या अभ्यास करू शकतील. मायक्रोफोन, स्पिकर्स आणि कॅमेरा असलेले हे रोबोट्स आणि विद्यार्थी एकमेकांसह संवाद साधू शकतात. विद्यार्थ्यांना ३ फूट लांब रोबो शाळेच्या मैदानातही नेता येणार आहे. टॅब्लेटच्या मदतीने विद्यार्थी रोबो नियंत्रित करू शकतात. यामध्ये स्पीकर लावण्यात आले असून, त्याच्या मदतीने विद्यार्थी घरून जे काही बोलेल ते रोबोट ऑडिओच्या स्वरूपात वर्गात सादर करेल. नुकताच त्याचा यशस्वी प्रयोगही झाला. कुमामोटो शहरातील शाळातील वर्गात नोव्‍हेंबरमध्‍ये रोबो उपलब्ध होतील यासाठी नियोजन केले जात आहे.

अभ्यासाचे नुकसान टाळणे आहे उद्देश्य
या नवीन उपक्रमाचा उद्देश गैरहजर विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आहे. शाळेतीतल सर्व कामे विद्यार्थ्यांना घरबसल्या रोबोटच्या माध्यमातून करता येणार आहेत. कोविड १९ नंतर, जपानमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अनेक मुलांना गुंडगिरीमुळे तर अनेकांना रॅगिंगमुळे शाळेत जायचे नसते. त्यामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे.

रोबोट विद्यार्थ्यांची मानसिक भीतीही दूर करेल

रोबोद्वारे संवाद साधणे हे पूर्णपणे वास्तववादी(realistic) नाही, परंतु इतरांशी संवाद साधण्यास जे विद्यार्थ्यी घाबरतात त्यांना किमान वास्तवाची ( reality) जाणीव करून दिली जाऊ शकते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मानसिक भीतीही दूर होण्यास मदत होणार आहे. खरेतर, जपानमध्ये २०२१ मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या २४४,९४० वर पोहोचली आहे जी विक्रमी नोंद होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese city to use robots to tackle rise in students absence from school snk