जगात अनेक लोक अशी काही कामे करतात ज्यामुळे त्यांची चर्चा होते. असेच एक काम जपानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने केले आहे. ज्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या तरुणाने लांडग्यासारखे दिसण्यासाठी तब्बल १८ लाख रुपये खर्च केले आहेत. हा प्रकार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या तरुणाने झेपेट नावाच्या कंपनीमध्ये चक्क लांडग्यासारखे दिसण्यासाठी १८ लाख रुपये खर्च केले. यावर तरुण म्हणाला, “मला लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. टीव्हीवर दिसणार्‍या प्राण्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करायचो. म्हणूनच मी खूप पूर्वी विचार केला की मला एखाद्या प्राण्यासारखे दिसले पाहिजे.

तो तरुण अनेक वेळा स्टुडिओत त्याच्या फिटिंगसाठी आणि मोजमापासाठी आला होता. कंपनीने सांगितले की, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आम्हाला प्रत्येक छोट्या डीटेल्स वाचाव्या लागल्या आणि वुल्फ ड्रेस तयार करण्यासाठी सुमारे ५० दिवस लागले. लांडग्याचा पोशाख घातल्यानंतर, तो तरुण कंपनीच्या कामावर खूप खुश झाला. त्याने असे सांगितले की त्याला हवा होता तसाच ड्रेस तयार झाला होता.

( हे ही वाचा: माणसांप्रमाणेच प्राणीही आपल्या पिल्लांना मिठी मारतात! IAS Officer सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच)

तरुण म्हणाला, ‘शेवटचे फिटिंग अजून व्हायचे आहे. पण स्वतःला आरशात बघून आश्चर्य वाटते. हा एक असा क्षण आहे जेव्हा माझे स्वप्न पूर्ण झाले. याशिवाय, तरुण म्हणाला, ‘मागच्या पायांवर चालणाऱ्या खऱ्या लांडग्यासारखे दिसणे’ हे माझे लक्ष खरं तर अवघड होते, परंतु संपूर्ण सूट माझ्या कल्पनेप्रमाणेच बनला आहे.”

कंपनीने सांगितले की, आम्ही प्राण्यांचा पोशाख डिझाइन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी टोको नावाच्या व्यक्तीने स्वतःला कुत्र्याचे रूप दिले होते. एका सुंदर पोशाखासाठी त्याने १२ लाख खर्च केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese man spend 18 lakh rupees for look like a wolf photo goes viral on internet gps