चोराने केलेल्या चोरीची चर्चा सोशल मीडियावर व्हावी, नक्कीच काहीतरी मोठी चोरी असावी, नाही का ? मात्र, एखाद्या चोरानं पैसा, किंवा मौल्यवान वस्तूंना बाजूला सारून फक्त महिलांच्या ठराविक वस्तूचीच चोरी करावी, याला तुम्ही काय म्हणाल? होय! सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या चोराची चर्चा सुरू आहे. हा चोर महिलांच्या एका विशिष्ट वस्तूसाठी इतका वेडा होता की, ती चोरण्यासाठी तो आपल्या जीवाची पर्वा न करता चोरी करत असे. पोलीसांना चकमा देत फक्त ही वस्तू चोरत होता. मात्र, चोरी ही चोरी असते, ती लहान असो की मोठी ती कायद्याने गुन्हाच. अखेर पोलिसांनी त्याला पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे प्रकरण नेमक कुठलंय ?

हे प्रकरण जपानचं आहे. हा चोरीचा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा चोर महिलांच्या एका विशिष्ट वस्तूसाठी इतका वेडा होता की ती चोरण्यासाठी तो आपल्या जीवाची बाजी लावत असे. पकडले जाण्याची रिस्क पत्करूनही तो चोरी करत असे. गेली अनेक वर्ष हा चोर पोलिसांना चकमा देत ही वस्तू चोरत होता. शेवटी पोलीसांनी त्याला बेडया ठोकल्या.

(आणखी वाचा : नेटकरी म्हणाले, ‘हे’ दृष्य स्वप्नाहूनही सुंदर… ‘ती’ महिला, तिचा पाळीव ‘कुत्रा’ आणि ‘तो’ घोडा सर्व अफलातून…)

हा चोर ‘या’ वस्तूच्या प्रेमात
खरंतंर हा चोर महिलांच्या ‘रेनकोट’चा दिवाना होता. तो महिलांच्या रेनकोटची चोरी करत असे. फक्त रेनकोटची चोरी करणे, हाच त्याचा धंदा होता. मात्र, महिला वापरत असलेला रेनकोट हा त्याच्या आकर्षणाचा विषय होता. हा चोर रेनकोट घालून जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करत असे. त्यानंतर या महिलांच्या रेनकोटची चोरी करत असे. रेनकोट काढून ही महिला एखाद्या दुकानात किंवा कार्यालयात गेली की, हा चोरटा रेनकोट घेऊन पसार होत असे.

शेवटी महिलांनी कंटाळून अनेक ठिकाणी या चोरटयाची पोलीसांत तक्रार केली. पोलीसांनी त्याच्या कृत्याची गंभीर दखल घेत त्याला बेडया ठोकल्या. या जपान मधील चोरट्याचे नाव योशिदो योदा आहे. हा ५१ वर्षांच्या चोरटयाला पोलीसांनी ‘रेनकोट मॅन’ असे नाव दिले. आता हा चोर याच नावाने सोशल मीडियात प्रसिध्द झाला.