चमत्कारिक घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण नेहमीच पाहतो. सध्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होतोय. या भीषण अपघातात वाहनाचा चालक आश्चर्यकारकरित्या बचावल्याचे दिसत आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडिओत एक मोटारचालक रस्त्यावरून चुकीच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका गाडीने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटारचालक हवेत उडाला. मात्र, जमिनीवर पडताना त्याने शिताफीने स्वत:चा तोल सांभाळला आणि अलगदपणे पायांवर उभा राहिला. इतका मोठा अपघात होऊनही त्याच्या अंगाला साधी जखमसुद्धा झाली नव्हती. ही घटना पाहता ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्याचा पुरेपूर प्रत्यय येतो. ‘डेली मेल चायना’ने हा व्हिडिओ प्रदर्शित केला असून त्याला सोशल मीडियावर लाखो हिट्स मिळत आहे.