Jawaharlal Nehru Viral Video Fact Check: लाइटहाऊस जर्नालिज्मला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओमध्ये ते सुरुवातीलाच म्हणताना दिसत होते की, “मी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी नव्हतो”‘. तपासादरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमला हा व्हिडिओ एडिट केल्याचे आढळून आले. जवाहरलाल नेहरूंनी आपण स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी नसल्याचे खरंच म्हटलेय का, हा जुना व्हिडीओ नेमका काय आहे, हे जाणून घेऊया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Vision2047 ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओमधील कीफ्रेम्सवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्हाला X वापरकर्ता ऋषी बागरीची पोस्ट आढळली ज्याने तोच व्हिडीओ शेअर केला होता परंतु सुरुवातीपासूनचे फुटेज यात नव्हते. व्हिडीओत दूरदर्शन आर्काइव्हजचा वॉटरमार्क होता.

त्यानंतर आम्ही या व्हिडीओमधील कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च देखील चालवला आणि प्रसार भारती आर्काइव्हजच्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडीओ आम्हाला सापडला.

व्हिडीओचे शीर्षक होते: Jawaharlal Nehru’s last TV interview – May 1964

व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटले होते की (भाषांतर): पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मे १९६४ मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी अमेरिकन टीव्ही होस्ट अर्नॉल्ड मिचजवाहरलाल यांना दिलेली शेवटची महत्त्वाची मुलाखत. चंद्रिका प्रसाद यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे १८ मे १९६४ ला ही मुलाखत न्यूयॉर्कमध्ये प्रसारित झाली होती, ही २७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंच्या निधनाच्या काही दिवस आधीची ही मुलाखत आहे.त्याच YouTube चॅनेलवर आम्हाला एक शॉर्ट व्हिडीओ देखील सापडला.

इथे जवाहरलाल नेहरू मोहम्मद अली जिनांबद्दल बोलत होते. नेहरू म्हणाले, “Mr Jinnah was not involved in the fight for independence, at all. Infact he opposed it.” अनुवाद: मिस्टर जिना स्वातंत्र्याच्या लढ्यात अजिबात सामील नव्हते. किंबहुना त्यांनी या लढ्याला विरोध केला होता.

निष्कर्ष: भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपण स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी नव्हतो असे म्हटले नाही, त्याऐवजी ते मोहम्मद अली जिना यांच्याबद्दल बोलत होते. व्हायरल व्हिडीओ एडिट केलेला आहे.