Jaya Kishori : प्रसिद्ध निरुपणकार आणि कथाकार जया किशोरी या दोन लाख रुपयांची बॅग वापरल्याने ट्रोल झाल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांच्याकडे असलेल्या सामानात ही बॅग दिसते आहे. यावरुन तुम्ही अशा कशा संत? तुम्ही लाखोंची बॅग कशी वापरु शकता? या सगळ्या टीकेवर आता जया किशोरी ( Jaya Kishori ) यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. तसंच मी संत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं हे प्रकरण काय आहे?

प्रसिद्ध निरुपणकार जया किशोरी यांच्या एका बॅगेमुळे वाद निर्माण झाला आहे. जया किशोरी विमानतळावरुन परतत असताना त्यांच्या सामानात लोकांना Dior Book tote ही बॅग असल्याचं दिसलं. त्यानंतर एक्सवरुन त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येतं आहे. दोन लाखांहून जास्त किंमतीची बॅग घेऊन कशा काय फिरता? स्वतःला संत म्हणवता आणि हे वर्तन शोभतं का? तसंच ही बॅग चामड्याची आहे असाही दावा काही लोकांनी केला. हा व्हिडीओ जया किशोरी ( Jaya Kishori ) यांनी पोस्ट केला होता. मात्र त्यांना ट्रोल करण्यात आलं ज्यानंतर त्यांनी या ट्रोलिंगवर उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Photos: एका कथेसाठी जया किशोरी घेतात एवढे मानधन; आपल्या कमाईमधून ‘या’ संस्थेला देतात मोठी देणगी

काय म्हणाल्या जया किशोरी?

“कुठलाही ब्रांड तो ब्रांड आहे म्हणून वापरला जात नाही. तुम्ही कुठेतरी जाता तुम्हाला तो ब्रांड आवडतो तो तुम्ही खरेदी करता. अनेक मुलं म्हणतात मला हे बूट आवडतात, मला ते कपडे आवडतात. मी जर काम करते तर मी तुमच्यासारखीच आहे. मी लेदर म्हणजे चामड्याच्या वस्तू वापरत नाही. माझ्या सामानात अशा काही वस्तू नाहीत. मला जर एखादी गोष्ट आवडली तर मी ती खरेदी करते त्यात काय गैर आहे? मी मेहनत करते, कमावते, त्यामुळे मी खरेदी करते. तुम्हीही तसं करा. भगवद्गीतेचाही विचार केला तर भगवद्गीता हे असं ज्ञान आहे जे जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. मात्र हे त्या व्यक्तीला दिलं गेलं जो पुढे राजा झाला. श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितलं नव्हतं की तू संन्यासी हो, तुझं ऐश्वर्य सोडून दे. देवाने अर्जुनाला हे सांगितलं की आपलं कर्म करत राहा. अध्यात्मिकतेचा अर्थ खरा हा आहे की तुम्ही वस्तू खरेदी करु शकता, त्या वस्तुंनी तुम्हाला कुणी विकत घेता कामा नये. मी ती मर्यादा पाळली आहे.” असं जया किशोरी ( Jaya Kishori ) म्हणाल्या.

मी काही संत वगैरे नाही-जया किशोरी

पुढे जया किशोरी म्हणाल्या, “माझी प्रवचनं, कथा, निरुपणं ऐकून तुम्ही जर हे म्हणणार असाल की जया किशोरी असं सांगते पण स्वतः ते अंमलात आणत नाही तर मी सांगेन की तुम्ही मेहनत करा आणि पैसे कमवा हे मी सांगितलं आहे. त्यामुळे मी ते तुम्ही करा. तसंच ज्या बॅगेवरुन मला ट्रोल केलं जातं आहे ती चामड्याची नाही. तसंच ती बॅग मी अनेक वर्षांपासून वापरते आहे. पहिल्यांदाच ती बॅग दिसलेली नाही. मी अनेकदा त्या बॅगेचा फोटो, व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामुळे मी हा व्हिडीओ त्यांच्यासाठीच आहे जे माझ्यावर विश्वास ठेवतात. ज्यांना मी आवडते. कारण ज्यांना मी नाही आवडत त्यांच्यासाठी हा व्हिडीओ नाही. मी २२ वर्षांपासून काम करते आहे. कथा सांगण्याच्या वेळीही मी कधी चामड्याच्या बॅगा वापरलेल्या नाहीत. मी साध्वी, संत नाही. मला त्या आसनावर बसवू नका. मी माझ्या कुटुंबासह राहते. ज्यांना समजायचं असेल ते समजीतल कारण कितीवेळा स्पष्टीकरण देणार? ” असंही जया किशोरी ( Jaya Kishori ) म्हणाल्या.