Viral Video: अनेकदा रस्त्यावरील अपघातांचे विविध व्हिडीओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत असतो. अनेकदा हेल्मेट न घातल्यामुळेही खूप अपघात होतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक बाईक रायडर प्रवास करताना दिसत आहे. परंतु, या प्रवासात असे काही होते जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा बाईक रायडर स्वतः एका हाताने शूट करीत रस्त्यावरून प्रवास करीत आहे. त्यावेळी त्याच्या बाजूने मोठमोठ्या गाड्यादेखील जाताना दिसत आहेत. यावेळी पुढे गेल्यानंतर अचानक त्याच्या बाजूने जात असलेल्या फ्लॅटबेड कंटेनरवर ठेवलेल्या जेसीबीचा पत्रा उडून त्याच्या डोक्यावर पडतो. पण, त्यावेळी त्याने डोक्यावर हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचतो. डोक्यावर जेसीबीचा पत्रा आदळूनही तो न थांबता तसाच पुढे निघून जातो.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
UBER and Rapido bike drivers earn 80 thousand rupees per month
याला म्हणतात कष्ट! Uber अन् Rapido दुचाकीचालक महिन्याला कमावतो ८० हजार रूपये, VIDEO एकदा पाहाच
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
viral video sparks outrage Animal cruelty
किती ही क्रूरता! उंटाचे पाय दुमडून बसवले चक्क बाईकवर, Viral Video पाहून संतापले लोक
Truck and bike accident bike rider caught fire in telangana shocking accident video viral
ट्रकने धडक देताच दुचाकीने घेतला पेट, माणूस आगीत होरपळला अन्…, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल
a girl ride met an accident after a guy appreciate her as a good rider
पापाच्या परीचं कौतुक करताच धाडकन आपटली; VIDEO होतोय व्हायरल
Scooter driver saved his life by removing battery from electric scooter viral video on social media
चालकाचा एक निर्णय आणि मृत्यू टळला! स्कूटरमधून निघाला धूर अन्…, पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून बसेल धक्का, पाहा VIDEO

हेही वाचा: धावत्या ट्रेनमधून पडला प्रवासी, ‘ती’ने दाखवलेलं धाडस पाहून अंगावर येईल काटा; पाहा VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून, हा X (ट्विटर)वरील @crazyclipsonly या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकाने युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “याचं नशीब किती चांगलं आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “असे हेल्मेट बाईक रायडरसाठी खूप महत्त्वाचे आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “प्रत्येक बाईक चालविणाऱ्या व्यक्तीला याची जाणीव असायला हवी”

Story img Loader