Viral Video: अनेकदा रस्त्यावरील अपघातांचे विविध व्हिडीओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत असतो. अनेकदा हेल्मेट न घातल्यामुळेही खूप अपघात होतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक बाईक रायडर प्रवास करताना दिसत आहे. परंतु, या प्रवासात असे काही होते जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा बाईक रायडर स्वतः एका हाताने शूट करीत रस्त्यावरून प्रवास करीत आहे. त्यावेळी त्याच्या बाजूने मोठमोठ्या गाड्यादेखील जाताना दिसत आहेत. यावेळी पुढे गेल्यानंतर अचानक त्याच्या बाजूने जात असलेल्या फ्लॅटबेड कंटेनरवर ठेवलेल्या जेसीबीचा पत्रा उडून त्याच्या डोक्यावर पडतो. पण, त्यावेळी त्याने डोक्यावर हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचतो. डोक्यावर जेसीबीचा पत्रा आदळूनही तो न थांबता तसाच पुढे निघून जातो.

हेही वाचा: धावत्या ट्रेनमधून पडला प्रवासी, ‘ती’ने दाखवलेलं धाडस पाहून अंगावर येईल काटा; पाहा VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून, हा X (ट्विटर)वरील @crazyclipsonly या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकाने युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “याचं नशीब किती चांगलं आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “असे हेल्मेट बाईक रायडरसाठी खूप महत्त्वाचे आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “प्रत्येक बाईक चालविणाऱ्या व्यक्तीला याची जाणीव असायला हवी”