लग्न सोहळ्यात झालेल्या भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला लग्न समारंभाचा असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. लग्न समारंभाचे मजेदार व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. यामध्ये लग्नादरम्यान कॅमेरामन स्टेजवर असे काही करतो, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

लग्नसोहळ्यात नवरा मुलगा रागवल्यानंतर नवरीच्या खळखळून हसण्याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. यामध्ये फोटो काढताना फोटोग्राफर नवरीला वारंवार स्पर्श करत होता. हे पाहून नवरदेवाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने फोटोग्राफरच्या कानशीलात लगावली. हे बघताच नवरी खळखळून हसू लागली.

Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media
“लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Groom bride dance video in there wedding on marathi song video goes viral
VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल

नेमकं काय घडलं?

लग्न झाल्यानंतर नवरदेवाला बाजूला सारत नवरीचा क्लोजअप फोटो काढण्याच्या नादात फोटोग्राफरला चांगलाच दणका बसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. बरं फोटोग्राफरने नवरदेवाचा मार खाल्ल्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत नाहीये. तर फोटोग्राफरने मार खाल्ल्यानंतर नवरीच्या खळखळून हसण्याचे नेटीझन्स दिवाणे झाले आहेत. नवरीच्या हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मारल्याचे कळताच तिने मंचावरच पोट खळखळून हसायला सुरुवात केली. तिचे हे हसणे बाजूच्या एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – नियंत्रण सुटल्यानं पेट्रोल पंपावर अपघात; Video पाहून नेटकरी म्हणतात अरे हा तर “पापा का परा”!

नवरीच्या हसण्याने नवरदेव, फोटोग्राफरचा राग गुल्ल

आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मारलं हे समजल्यानंतर व्हिडीओमध्ये नवरी अगदीच मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. हसणे न आवरल्यामुळे ती लग्नाच्या स्टेजवरच बसून पोट धरून हसत आहे. तिचे हेच हसणे बघून तिच्या नवऱ्याचाही राग पळून गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. सुरुवातीला रागात असलेला नवरदेव नवरीचे हसणे बघून नंतर तोही हसतोय. तर दुसरीकडे चोप बसलेल्या कॅमेरामॅनलासुद्धा आपले हसणे आवरलेले नाही. तोही नवरीसोबत हसताना दिसत आहे

Story img Loader