आपल्या जोडीदाराने फक्त आणि फक्त आपल्यावरच प्रेम करावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आयुष्याच्या एखाद्या वळणावर जोडीदार दुसऱ्या कुणामध्ये जास्त रस घेत असेल तर अनेक गोष्टी बिघडू लागतात. अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस हे सध्या याच अनुभवातून जात आहेत. जेफ बेझोस यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ आणि हॉलिवूड स्टार ‘टायटॅनिक’ फेम लिओनार्डो डिकॅप्रिओ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळे मीम्स शेअर करण्यात सुरूवात केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जेफ बेझोस यांनी एक प्रतिक्रिया दिलीय. ही प्रतिक्रिया पाहून तुम्ही खदखदून हसाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ‘टायटॅनिक’ फेम अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रियो आणि लॉरेन सांचेझ हे एकमेकांसोबत बोलताना दिसून येत आहेत. लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या 10 व्या वार्षिक काउंटी म्युझियम ऑफ आर्ट अँड फिल्म गाला या कार्यक्रमात अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ आले होते. त्यावेळी ते हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रिओला भेटले. यावेळी जेफ बेझोस हे बाजुला शांत उभे असल्याचं दिसून येतंय. पण त्यांची गर्लफ्रेंड मात्र या हॉलिवूड स्टार लिओनार्डो डी कॅप्रियोसोबत गप्पागोष्टी करण्यात गुंतलेली दिसून येतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ ही हॉलिवूड स्टार लिओनार्डो डी कॅप्रियोकडे आकर्षित होतेय, असं वाटू लागतं. यावेळी अभिनेत्याची बॉडी लॅंग्वेज सुद्दा चर्चेचा विषय ठरलाय.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरू लागला. यावरून नेटिझन्सनी विनोदी मीम्स शेअर करण्यात सुरूवात केली. या व्हिडीओला आतापर्यंत १६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलाय.

इथे वाचा काही मजेदार मीम्स…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एक ट्विट शेअर करत एक जबरदस्त प्रतिक्रिया देत थेट लिओनार्डो डी कॅप्रियोला धमकीच दिलीय. “लिओ, इकडे ये, मला तुला काहीतरी दाखवायचंय” असं त्यांनी ट्विट शेअर करत लिहिलंय. यासोबत त्यांनी एक फोटो देखील शेअर केलाय. या फोटोमध्ये जेफ बेझोस हे शर्टलेस दिसत आहेत. एका बोर्डच्या शेजारी शर्टलेस होऊन उभे असलेले दिसून येत आहेत. या बोर्डवर लिहिलंय, “धोका! खोल दरी आहे. घातक वळण.”

अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या गर्लफ्रेंडचा हॉलिवूड स्टार लिओनार्डो डी कॅप्रियो सोबतच्या व्हायरल व्हिडीओवर दिलेली ही प्रतिक्रिया पाहून नेटिझन्सना हसू आवरणं कठीण होत आहे. त्यांच्या या ट्विटवर सुद्धा नेटिझन्सनी मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली. या ट्विटला आतापर्यंत १.४ लाखांहून अधिक लाइक्स आणि हजारो कमेंट्स व्हायरल होऊ लागले आहेत.

जेफ बेझोस हे २०१९ पासून अमेरिकन न्यूज अँकर लॉरेन सांचेझशी रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांच्या रोमँटिक नात्याची जगभर चर्चा आहे. अॅमेझॉनच्या प्रमुख जेफ बेझोस यांच्यासोबत २५ वर्ष एकत्र संसार केलेल्या त्यांची पत्नी मॅकेन्झी स्कॉटला घटस्फोट दिला. दोघांच्या घटस्फोटाची बातमी बाहेर येताच जेफ आणि त्यांची नवीन गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या रिलेशनशीपच्या बातम्या पसरू लागल्या.

Story img Loader