माहिती देण्यासाठी कोणी उपलब्ध होत नसेल तर गुगल सर्च करुन ती माहिती मिळवली जाते. आज गुगलने माहितीचा शोध घेण्यासाठी इतके पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत की कोणतीही माहिती काही मिनीटांच्या आत आपल्यासमोर उपलब्ध असते. विशेष म्हणजे कोणत्याही सेलिब्रिटीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा फोटो पाहण्यासाठी आपण तात्काळ गुगलमधील फोटो फिचरचा आधार घेतो. मात्र या फोटो फिचरचा जन्म नक्की कसा झाला हे फार कमी जणांना ठाऊक आहे. विशेष म्हणजे या फोटो फिचरचा जन्म हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगर जेनिफर लोपेझमुळे झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००० साली झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये जेनिफर लोपेझने हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या गाऊनची त्यावेळी प्रचंड चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे तो गाऊन पाहण्यासाठी अनेकांनी गुगल सर्चदेखील केलं होतं. त्यामुळे गुगलवर सर्वाधिक सर्च झालेला हा ड्रेस ठरला होता. जेनिफरने वर्सा या ब्रॅण्ड गाऊन घातला होता.

काही दिवसापूर्वी जेनिफरने मिलान फॅशन विकमध्ये हाच ड्रेस पुन्हा एकदा घालून रॅम्पवॉक केला. यावेळी देखील तिचा तोच ग्लॅमरस अंदाज आणि लूक पाहून प्रत्येकाला १९ वर्षांपूर्वीच्या तिच्या त्या लूकची आठवण आली. त्यावेळी गुगलवर फोटो फिचर हा स्वतंत्र पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे जेनिफरचा हा फोटो सर्च करण्यासाठी प्रत्येक युजर्सला लिंकवर क्लिक करावं लागत होतं. यावर उपाय म्हणून गुगलने चक्क ‘गुगल इमेजेस’ हे नवं फिचर तयार केलं. विशेष म्हणजे हे फिचर गुगलसाठी फायदेशीर ठरलं. आजही प्रत्येक जण कोणताही फोटो सर्च करण्यासाठी या फिचरचा वापर करतो.