Jethalal Happy Diwali Song: देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या प्रत्येक भागात दिव्यांचा हा सण मोठ्या साजरा केला जात असून हा सण भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा भारतीय सण, सण-उत्सवाच्या परंपेतील सर्वात मोठा सण आहे. धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या या सणाचा दुसरा दिवस म्हणजे छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशीही म्हणतात. वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात झाली. धनत्रयोदशी झाली. आता नरक चतुर्दशी. दिवाळीची पहिली पहाट, पहिली अंघोळ. त्यानिमित्ताने तुम्हीही तुमच्या मित्र मैत्रीणींना दिवाळीच्या शुभेच्छा देणार असालच तर जेठालालच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा देऊन दिवाळी आणखी स्पेशल कराल. तारक मेहता का उल्टा चष्मा या हिट कार्यक्रमामधील जेठालालचे हॅपी दिवाळी गाणे गाताना जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणा ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल तसेच ज्याला पाठवाल त्याच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा