इंग्रजीमधील ते तीन प्रेमळ शब्द म्हणजेच आय लव्ह यू असे असले तरी मराठीमध्ये हे फारसं मनाला भिडणारं नसल्याचं मानलं जातं. त्यातच आजच्या सोशल मिडियाच्या युगामध्ये आय लव्ह यू वगैरे फार ओल्ड स्कूल त्यापेक्षा कंटाळवाणं वाटतं. त्यामुळेच सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘जेवलीस का?’ या शब्दांचा आधार घेतला जातोय. अर्थात तरुणाईला याचा अंदाज असेल कारण अनेक मिम पेजेसवर या ‘जेवलीस का?’संदर्भातील अनेक मिम्स त्यांनी पाहिली असतील. पण ज्यांना यासंदर्भात ठाऊक नाही त्यांना अगदी सोप्य शब्दात सांगायंच झालं तर ‘जेवलीस का?’चा अर्थ तुझ्यात मन अडकलं आहे असं घेतला जातोय. म्हणजे पाठवणाऱ्यालाही ते समजतं आणि ज्याला पाठवला जातोय त्यालाही. हे शब्द जेवणाऐवजी जीवनाशी निगडीत झालेत. सोशल मिडियावर या ‘जेवलीस का?’ची तुफान चर्चाय. हल्ली तुझ्यामध्ये इन्ट्रेस्टेड आहे यासाठी किंवा पहिल्यांदा संभाषणाला सुरुवात करताना दोन्हीकडून हाय झाल्यानंतर मुलाकडून विचारला जाणारा पुढचा प्रश्न हा ‘जेवलीस का?’ असतो. यावरुन अनेक मिम्सही व्हायरल झालेत. आता मराठी तरुणाईच्या याच नव्या प्रेमवाक्याचा आधारा स्वीगीने आपल्या प्रमोशनसाठी घेतलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा