मुलांना गाडीत एकटे सोडून शॉपींग किंवा अन्य कामांसाठी जाणारे पालक अनेकदा दिसतात. मात्र, अनेकदा गाडीमध्ये मुलांना सोडून जाण्याचं धाडस कधी कधी पालकांच्या अंगाशी येतं. अनेकदा तर मुलांचा गाडीतच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी सुद्धा पालक यातून कोणताच धडा घेत नाहीत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

झारखंडमधील बोकारो इथे ही मोठी दुर्घटना घडली. झारखंडमधल्या तेनुघाट धरणाच्या वरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओला अचानक आग लागली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारला आग लागली, तेव्हा त्यात काही मुले बसली होती, असं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी कसंबसं गाडीत बसलेल्या या मुलांना वाचवलं.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

आणखी वाचा : विना तिकीट प्रवास करणाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्याने चालत्या ट्रेनमध्ये लाथ मारली, क्रूरतेचा VIDEO VIRAL

मिळालेल्या माहितीनुसार, गिरिडीह जिल्ह्यातील धनवरच्या करगली खुर्द इथले रहिवासी मोहम्मद सिराज हे आपल्या कुटुंबासह सहलीसाठी तेनुघाट धरणावर आले होते. यादरम्यान त्यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी गोंधळ घातला आणि तेनुघाट ओपीचे प्रभारी प्रशांत कुमार सिंह यांना माहिती दिली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बुरखा घालून मुलगा बाकावर बसला, शेजारी बसलेल्या मुलीसोबत त्याने जे केलं ते पाहून हादरून जाल!

आगीच्या या घटनेनंतर अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे तेनुघाट ओपीचे प्रभारी अधिकारी यांनी सांगितले. गाडीला आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.

Story img Loader