मागील काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बरेलीच्या एसडीएम ज्योती मौर्य यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. नोकरी लागल्यानंतर नवऱ्याची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर खूप टीका करण्यात येत होती. शिवाय ज्योती मौर्य प्रकरणामुळे अनेक लग्न झालेल्या मुलींचे शिक्षण त्यांच्या नवऱ्यांनी बंद केल्याच्याही बातम्या समोर येत होत्या. अशातच आता झारखंडमधील गोड्डा येथून आणखी एक ज्योती मौर्य यांच्यासारखे प्रकरण समोर आले आहे. येथील एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयने कर्ज काढून पत्नीला नर्स केले आणि शिक्षण पूर्ण होताच ती मात्र प्रियकराबरोबर पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या टिंकू यादवचे लग्न प्रिया कुमारी हिच्याशी झाले होते. लग्नानंतर प्रियाला पुढे शिकायची इच्छा होती, टिंकूनेही पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले आणि तिला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी टिंकूने रात्रंदिवस मेहनत करून आणि पैसे कमी पडले म्हणून प्रसंगी अडीच लाखांचे कर्ज काढून पत्नी प्रियाला शकुंतला नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला.

Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार
Telangana News
मत्यूनंतर दहा दिवस घरातच ठेवला आईचा मृतदेह, दोन बहि‍णींनी…; दुःखद घटनेने तेलंगणा हादरले
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
hemant dhome and his wife kshiti jog
घटस्फोटाच्या वाढलेल्या प्रमाणावर हेमंत ढोमे आणि क्षिती जोगला काय वाटतं? म्हणाले, “सुख नसलेल्या संसारात…”
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

हेही पाहा- पठ्ठ्याने नोकरी लागल्याची माहिती अनोख्या अंदाजात दिली, फोटो पाहताच लोकांना नेत्यांची आठवण आली

प्रियाचा शेजाऱ्यावर जीव जडला –

लग्नाच्या दीड वर्षानंतर आणि शिक्षण पूर्ण होण्याआधीच प्रिया कुमारी दिलखुश राऊतच्या प्रेमात पडली. यानंतर प्रियाचे शिक्षण पूर्ण होताच ती दिलखुशबरोबर पळून गेली. टिंकूला या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळेपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, आता याप्रकरणी टिंकूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

प्रियाने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला अन्…

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रिया १७ सप्टेंबर रोजी दिल्लीला पळून गेली आणि तेथे तिने दिलखुशबरोबर कोर्टात लग्न केले. शिवाय या दोघांच्या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. याबाबतची माहिती टिंकूला समजताच त्याला धक्का बसला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठून पत्नी प्रिया कुमार आणि तिचा प्रियकर दिलखुश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलिसांनी सांगितलं, ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते गोड्डा बाहेर आहेत, मात्र या प्रकरणाशी संबंधित पुढील कारवाई सुरु आहे. पण पत्नीने पतीला धोका दिल्याच्या घटनेची सोशल मीडियावर आणि परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

Story img Loader