भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालत्या ट्रेनमधून व्यक्ती खाली पडला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चढताना त्याचा पाय अडखळतो आणि ट्रेनसोबत तो ओढला जातो. तेवढ्या एक महिला शिपाई तात्काळ तत्परनेनं त्या व्यक्तीला बाजूला ओढलं आणि त्याचा जीव वाचवला. हा व्हिडिओ झारखंडचा आहे. झारखंडच्या टाटानगर रेल्वे स्थानकावर, धडाकेबाज आरपीएफ कॉन्स्टेबल एसके मीना यांनी एका प्रवाशाला प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमध्ये पडण्यापासून वाचवले. या धाडसी महिला आरपीएफ कॉन्स्टेबलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: आगाऊ माकडानं लगावली तरुणीच्या कानाखाली, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

RPF_INDIA नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. त्या आरपीएफ महिलेचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा न घेता अशीच स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jharkhand rpf woman constable saved life of a man from running train video went viral srk
Show comments