Monkey Attending Class Viral Video : अनेकदा तुम्ही शाळांमधील विद्यार्थी वर्गात शिकताना पाहिले असतील. पण तुम्ही कधी माकडाला शाळेत जाताना पाहिलंय का? होय… सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माकड शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेत एक वर्गात सर्व विद्यार्थी खाली बसलेले आहेत. अचानक एक माकड वर्गात मागून येतो. हे पाहून सुरूवातीला काही विद्यार्थी घाबरून जातात. पण हे माकड कुणालाही काहीही न करता शांतपणे एका कोपऱ्यात बसतो. विद्यार्थी सुद्धा आपल्या जागी बसून शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष देताना दिसतात. हे माकड दररोज शाळेत जाऊन क्लासमध्ये येतं आणि शिक्षक काय शिकवतात हे ऐकत बसतं.

आणखी वाचा : माशासोबत सेल्फी घेतल्यानंतर फोन पाण्यात फेकला, मजेदार VIRAL VIDEO पाहाच!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ झारखंडमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. इथल्या हजारीबाग जिल्ह्यातील चौपारन येथील अपग्रेडेड प्लस टू हायस्कूल दानुआमध्ये हा अनोखा प्रकार समोर आला आहे. हे अनोखे माकड संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे. शाळा व्यवस्थापनाने त्याला हाकलण्यासाठी लाख प्रयत्न केले. पण माकड तिथून काही जायचं नाव घेत नाही. तो आता रोज शाळेत शिकण्यासाठी येत आहे. वर्गात आल्यानंतर हे माकड पहिल्या बाकावरच बसते. गेल्या सात दिवसांपासून तो सतत शाळेत येत आहे.

आणखी वाचा : Viral Video : पार्टी करणाऱ्या लोकांना सिंहिणीने दिलं ‘सरप्राईज’, एका व्यक्तीच्या मागेच पडली!

६ सप्टेंबर रोजी माकड पहिल्यांदा शाळेत आला. सकाळी १० वाजता पहिल्यांदा तो शाळेच्या नववीच्या वर्गात पहिल्या बाकावर बसला. वर्गात अचानक माकड पाहून शिक्षक व वर्गातील विद्यार्थी घाबरले. त्याला बाहेर काढण्यासाठी लाखो प्रयत्न झाले. पण माकड शांत राहून बाकावर बसले. थोड्या वेळाने हिंमत एकवटून मुलंही अभ्यासाला बसली. तेव्हापासून हे माकड दररोज नियोजित वेळेत शाळेत येत आहे.

आणखी वाचा : रस्त्यावर काम करून पक्ष्यांची भूक भागवतो हा व्यक्ती, मनाला भावणारा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : उगाच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत नाहीत…हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाने ही माहिती वन विभागाकडे दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला पकडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण यात ते अपयशी ठरले. अजुनही या माकडाला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. पण अद्याप ते काही माकडाला पकडू शकले नाहीत. पण शाळेत शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी दरदरोज येणारं हे माकड सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

Story img Loader