Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक काही तरुण चक्क रेल्वे रुळावर बाईक चालवत आहेत. रील बनवण्यासाठी तरुणांची ही स्टंटबाजी सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुमचाही श्वास थांबेल.

रेल्वेसंबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी रेल्वतील भांडणाचे व्हिडिओ, कधी रेल्वेमध्ये डान्सचे व्हिडिओ, स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.याशिवाय, रेल्वे अपघातांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा लोक धावत्या रेल्वेमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमवतात. याशिवाय स्टंट करताना देखील लोक जीव धोक्यात घालतात. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियैावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण जेव्हा रेल्वे पटरीवरुन क्रॉस करायला जातो तेव्हा असे काही घडते की पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक रेल्वे पुल दिसत आहे.जर पुलाची उंची पाहिली तर अतिशय उंचावर हा रेल्वे पुल बांधण्यात आलेला आहे.ऐवढेच नाही तर पुलाची रुंदीही अतिशय कमी आहे. पुलाला दोन्ही बाजूने कोणतीही तटबंधी नाही अशा या धोकादायक पुलावरुन एक तरुण वेगवान बाईक चालवत आहे आणि त्याच्या पाठी अजून दोन प्रवाशी बसलेले आहे,अशात या धोकादायक पुलावरुन जात असताना ते रील्स बनवत आहेत. चुकूनही तोल गेला असता तर तिघही उंच पुलावरुन खाली कोसळले असते अन् क्षणात खेळ खल्लास झाला असता. अशात सर्वांचा जीवही गेला असता.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका युजरने लिहिले, “अशा लोकांना फक्त पोलीस लाठीमारच सुधारू शकतात.”

Story img Loader