राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर ड्राइव्हरशिवाय जवळपास एक किलोमीटर धावल्याचा धक्कादायक थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या कंटेनरने महामार्गावरील अनेक खांबासह झाडे आणि दुकांनाना धडक दिली आहे. ही घटना झारखंडमधील लोहरदगा राष्ट्रीय महामार्ग 143A वर घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ड्रायव्हरने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चालू कंटेनरमधून उडी मारली. या थराराक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर ड्राइव्हरशिवाय धावणाऱ्या कंटेनरमध्ये भंगार भरलेलं होतं. कंटेनर भरधाव वेगात असताना चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर आवरणं अशक्य वाटल्यामुळे त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चालू कंटेनरमधून उडी मारली. ड्राइव्हरने उडी मारली तरीदेखील कंटेनर महामार्गावर वेगाने धावतच राहिला.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट

हेही पाहा- Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…

या कंटनेरने त्याच्या मार्गात आलेल्या झाडांसह विजेचे खांब आणि दुकानांचे नुकसान केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा कंटेनर ड्राइव्हरशिवाय जवळपास एक किलोमीटर धावत होता. कंटनेर वेडावाकडा धावताना पाहून अनेक लोकांना भीती वाटली. दरम्यान, हा कंटेनर एका झाडाला आदळला आणि थांबला त्यावेळी झाडाचा मोठा भाग देखील कंटेनरवर पडला.

अन् तरुणाने लावला ब्रेक –

यावेळी लोकांना कंटेनरमध्ये कोणी ड्रायव्हर नसल्याचं पाहून धक्काच बसला. शिवाय हा कंटनेर झाडाला धडकला तरीदेखील तो पुढे जात होता. मात्र, त्याचा वेग कमी झाला होता. त्याचवेळी तिथे उपस्थित असणारा एक तरुण मोठ्या चलाखीने त्या कंटेनरमध्ये चढला आणि त्याने कंटेनरचा ब्रेक लावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

हा थरार पाहणाऱ्या विमलकांत सिंह आणि चंदनकुमार मिश्रा यांनी सांगितले की, “सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवाय कंटेनरचा वेग कमी झाल्यावर तरुणाने साहसाने कंटेनरमध्ये चढून ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर त्या तरुणाने हा कंटेनर थांबवला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती.” या घटनेचा थरारक व्हिडीओ सोहन सिंग नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे.

हेही वाचा- हृदयद्रावक: पोलिसांनी फेकलेला तराजू उचलण्यासाठी गेलेल्या भाजीविक्रेत्याला गमवावे लागले दोन्ही पाय

दरम्यान, या थरारक घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेतील कंटेनर जप्त केला असून कंटेनरमधून उडी मारुन फरार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध सुरु केला असल्याचं लोहरदगा पोलिस ठाण्याचे प्रभारी पंकज कुमार शर्मा यांनी सांगितलं.

Story img Loader