पॉर्न इंडस्ट्रीमधील सर्वाधिक चर्चेतील नावांपैकी एक असणारे नाव म्हणजे पॉर्नस्टार मिया खलिफा. पॉर्न इंडस्ट्रीमधून अवघ्या तीन महिन्यांमध्ये फारकत घेणारी मिया आता ती सामान्य जीवन जगत आहे. मात्र असं असलं तरी तिच्यावरील पॉर्नस्टार हा टॅग अजूनही गेलेला नाही याबद्दल नुकताच तिने एका मुलाखतीमध्ये खुसाला केला. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पॉर्नस्टारला बक्कळ पैसा मिळतो असा काहींचा समज असल्याचे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. मात्र आता तिच्या याच व्हिडिओवर जॉनी सीन्स या पॉर्नस्टार्सने एक रिप्लाय दिला आहे. या रिप्लायमध्ये त्याने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पैसा कसा कमावावा याबद्दलची माहिती मियाला दिली आहे. हा रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार म्हणून ओळखी जाणारी मिया खलिफा हिने नुकतीच ‘बीबीसी’ला एक मुलाखत दिली. २०१४-१५ दरम्यान मियाने तीन महिन्यांसाठी पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं होतं. तीन महिन्यांच्या या कारकिर्दीमुळे आयुष्यभरासाठी आपल्यावर पॉर्नस्टार असल्याचा ठपका बसल्याची खंत तिने या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. तसंच “मी खूप श्रीमंत असल्याचा अनेकांचा समज आहे जो चुकीचा आहे,” असं स्पष्टीकरणही मियाने या मुलाखतीमध्ये दिले होते. “अनेकांचा समज आहे की मी पॉर्न स्टार असताना लाखो रुपयांची कमाई केली आहे. मात्र हे पूर्णत: चुकीचं आहे. या विश्वात मी केवळ १२ हजार डॉलर म्हणजे ८ लाख ५२ हजार ६०६ रुपये कमावले आहे. या पैशांव्यतिरिक्त मला एकही रुपया एक्स्ट्रा मिळाला नाही. इतकंच नाही तर मला ही इंडस्ट्री सोडल्यानंतर सामान्य नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागला. तो काळ प्रचंड भितीदायक होता”, असं मिया या मुलाखतीमध्ये म्हणाली आहे. तीने आपल्या ट्विटवरुनही या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
People think I’m racking in millions from porn. Completely untrue. I made a TOTAL of around $12,000 in the industry and never saw a penny again after that. Difficulty finding a normal job after quitting porn was… scary. Full interview here: https://t.co/xHK7SmhfrY pic.twitter.com/fwJlyzHznq
— Mia K. (@miakhalifa) August 12, 2019
याच ट्विटला जॉनी सीन्सने रिप्लाय केला आहे. “जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंपनीसाठी काम करता तेव्हा तुम्ही दर दिवसाचे मानधन ठरवून घ्यायला हवे. म्हणजेच तुम्ही कीती दिवस आणि किती दृष्यांचे चित्रीकरण करता यावर तुमची कमाई अवलंबून असते. म्हणजेच जर बारा दिवस काम केले तर १२ हजार डॉलर आणि ३६५ दिवस केले तर सरासरी ३६५ हजार डॉलर कमाई करु शकता. म्हणूनच या श्रेत्रात पैसे कमवण्यासाठी स्वत: स्वत:चा कंटेंट चित्रित करणं महत्वाचं असतं,” असं जॉनीने ट्विट करुन म्हटलं आहे.
As far as shooting for other companies, other than your own, you make a day rate. Thus it depends on how many days/scenes you shoot. If you shoot 12 you make $12k if you shoot 365 you make $365k (on average) that’s why it’s important to shoot your own content, $ for life https://t.co/YcrgCYubCv
— Johnny Sins (@JohnnySins) August 13, 2019
मियाने आपल्या कमाईचा आकडा सांगितल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. याच मुलाखतीमध्ये तिने आपण पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे सांगितल्यानंतर घरच्यांनी आपल्याबरोबरचे सर्व संबंध तोडल्याची खंतही मियाने बोलून दाखवली होती.