नात्यांची मजाच काही और असते. मग ते कुणाचंही असो. मेहुण्यांना तर आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. भावोजी आणि मेहुणी यांचं नातं फार मजेशीर असतं. एकमेकांचे पाय खेचण्यात हे दोघेही पुढे असतात. पण प्रसंगी भावोजी अगदी भावासारखं आपल्या मेहुणीच्या पाठीशी उभे राहतात. तिचं रक्षण करतात. सध्या सोशल मीडिया वर असाच एक भावोजी आणि मेव्हणीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये मेव्हणीसोबत भावोजी एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. लग्नात सुंदर मेव्हणी डान्स फ्लोअरवर ठुमके लावत असते. मेव्हणीचा डान्स पाहून भावोजीला ही स्टेजवर डान्स करण्यावाचून रहावलं नाही. भावोजी सुद्धा स्टेजवर नाचत नाचत येतो आणि मेव्हणीसोबत ताल धरतो. एका पंजाबी गाण्यावर जीजा-सालीचा जबरदस्त डान्स पाहून भावोजीला आनंद काही आवरता येत नाही. मग भावोजी आपल्या खिशातून नोटांचे बंडल काढतात ते पैसे सुंदर मेव्हणीवर उडवू लागतात. भावोजी आणि मेव्हणी यांच्यातील ही केमिस्ट्री लोकांना खूपच आवडत आहे.
मेव्हणी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर जबरदस्त हावभाव दाखवताना दिसतेय. भावोजींनी मात्र बिनधास्त अंदाजात आपल्या मेव्हणीला चांगली साथ दिली आहे. मग तिच्या लयीत लय मिळवत नाचण्याचा प्रयत्नही उत्तम. amar.086 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. इंस्टाग्राम वर नेहमीच असे काही ना काही तरी लोक शेअर करत असतात. युजर्सना ते आवडले तर लगेच गोष्टी व्हायरल होतात. हा व्हिडीओ देखील असाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा डान्स पाहून घरची मंडळी अक्षरश: पाणी-पाणी झाली.