रिलायन्सने जिओ सेवा सादर करुन ‘डेटागिरी’ चा नवा अध्याय सुरु केला. रिलायन्स कंपनीने ही सेवा सुरु करुन अन्य मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना धक्का दिला. या सेवेत रिलायन्स कंपनीने ग्राहकांना अमर्यादीत डेटा देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या अमर्यादीत डेटावर देखील काही मर्यादा कंपनीने घातल्या असल्याचे दिसून येते.  या मर्यादांची कदाचित काही ग्राहकांना कल्पना देखील नाही. जर तुम्ही जिओचे पॅक जाणून घेण्यासाठी कंपनीच्या साईटवर भेट दिली, तर कंपनीने आपल्या पॅकमध्ये घालून दिलेल्या मर्यादा  स्पष्ट होतील. डिसेंबर पर्यंत ग्राहकांना अमर्यादीत डेटा उपलब्ध करुन देणार असल्याचे कंपनीने म्हटले असले तरी कंपनीने उपलब्ध करुन दिलेल्या पॅकवर काही मर्यादाही आहेत. नव्या पॅकमध्ये ४ जीबी डेटा मोफत मिळणार आहे.  ४ जीबीनंतर वापरकर्त्याचे इंटरनेट स्पीड १२८ kbps इतके कमी होणार आहे.  ५० रुपयांच्या पॅकमध्ये रात्री अमर्यादीत डेटा मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. मात्र कंपनीने यासाठी रात्रीची वेळ मध्यरात्री २ वाजल्यापासून ५ पर्यंत दिली आहे. अर्थात कंपनी रात्री ३ तासाच मोफत डेटा वापरता येणार आहे. जिओ ५० रुपयांमध्ये १ जीबी डेटा देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे, मात्र या सुविधेचा लाभ मिळविण्यासाठी ग्राहकांना १४९ रुपयांचा रिचार्ज करणे अनिवार्य असणार आहे.

Story img Loader