रिलायन्स जिओ कायमच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कल्पक उपक्रम घेऊन येत असतं. यावेळीही एक नवं फीचर आणून जिओने आपल्या ग्राहकांची सोयच केली आहे. आता जिओच्या ग्राहकांना व्हॉटसपवरुनही रिचार्ज करता येणार आहे. त्यासाठी जिओने आपला एक व्हॉटसप नंबरही दिला आहे.

कसा कराल रिचार्ज?

व्हॉटसपच्या माध्यमातून आता जिओचे ग्राहक सगळ्या प्रकारचे रिचार्ज करु शकणार आहेत. सिम रिचार्ज, जिओ फायबर रिचार्ज असे सगळे रिचार्ज करणं शक्य होणार आहे. याशिवाय व्हॉटसपवरुनच ग्राहक आता नवं सिमकार्ड, एमएनपी, सिमकार्ड सपोर्ट, जिओ फायबर कस्टमर सपोर्ट आणि जिओ मार्टसाठी कस्टमर ह्या सुविधाही व्हॉटसपच्या माध्यमातून मिळणार आहेत. रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना 7000770007 या व्हॉटसप क्रमांकावर Hi असा मेसेज करायचा आहे. पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना युपीआय, फोनपे, गुगलपे, अॅमेझॉन असे वेगवेगळे पर्यायही दिले जाणार आहेत.

जिओ फोनसाठी व्हॉटसप कॉलिंग…

जिओने नुकतंच एक नवं फीचर ग्राहकांसाठी आणलं आहे. जिओ फोनच्या माध्यमातून आता व्हॉटसप व्हॉईस कॉलही करता येणार आहे. जिओ फोन यूजर्स आता व्हॉटसपच्या माध्यमातून ग्राहक अनलिमिटेड कॉल्स करु शकणार आहेत. जिओ फोनमध्ये हा व्हॉटसप कॉल VoIP या तंत्रज्ञानाच्य साहाय्याने करता येणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट असेल तर तुम्ही हा कॉल करु शकणार आहे.

Story img Loader