Jitendra Awhad Reel Competition: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा काल (५ ऑगस्ट) ६० वा वाढदिवस होता. आपण हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं होतं. यानंतर काल ठाण्यात आव्हाडांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी त्यांनी एका अनोख्या स्पर्धेची सुद्धा अनौपचारिक घोषणा केली. मणिपूर व महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांचे दाखले देत आव्हाडांनी विद्यार्थ्यांना सुद्धा याविषयी बोलण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात दंगली पेटवल्या जात आहेत आणि याविषयी समाजाला माहिती द्यायची असेल तर सोशल मीडियाचा वापर हा करायलाच हवा असे म्हणताना आव्हाडांनी विद्यार्थ्यांना “तुमच्यापैकी कोण रील बनवतं” असा प्रश्न केला.
आव्हाड म्हणाले की, “तुम्ही रील करत नसाल तर तुम्ही त्या करायला सुरुवात केली पाहिजे, कारण आता लोकांपर्यंत पोहोचण्याचं, एखाद्या विषयावर व्यक्त होण्यासाठी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम हे सर्वोत्तम माध्यम बनलं आहे. शिवाय मीच आता रीलची स्पर्धा भरवणार आहे, सर्वोत्तम रील करणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस सुद्धा असणार आहे”.
Video: सर्वोत्तम रीलला १० लाखांचं बक्षीस
हे ही वाचा<< राज ठाकरेंचा आवडता रीलस्टार कोण? Reel Baaz कार्यक्रमात उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले…
अलीकडे राजकीय नेते व पक्षांनी रील व एकूणच सोशल मीडियावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच मनसेचा रील बाज हा अवॉर्ड्स सोहळा सुद्धा यातीलच एक भाग म्हणता येईल. याशिवाय अनेक पक्ष आपल्या प्रचारासाठी सुद्धा या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्सची मदत घेत आहेत. अशात आव्हाडांनी केलेली अनौपचारिक घोषणा खरोखरच अंमलात आली तर आश्चर्य वाटणार नाही.