Engineer Rashid Fact Check : बारामुल्लाचे खासदार शेख अब्दुल रशीद, ज्यांना इंजिनियर रशीद म्हणूनही ओळखले जाते, त्यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वी टेरर फंडिंग प्रकरणातून अंतरिम जामीन मंजूर झाला. यानंतर त्यांची ११ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. पण, त्यांच्या सुटकेनंतर लाइटहाऊस जर्नलिझमला भाजपाच्या लेटरहेडवर लिहिलेले एक पत्र व्हायरल होत असल्याचे आढळून आले, ज्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी अब्दुल रशीद शेख (इंजिनियर रशीद) यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पत्रावर भाजपा नेते रवींद्र रैना यांचे नाव आणि स्वाक्षरीदेखील दिसून आली. रवींद्र रैना हे जम्मू-काश्मीर भाजपाचे अध्यक्ष आहेत, पण खरंच भाजपाच्या वतीने असे कोणते पत्र लिहिण्यात आले आहे का? जाणून घ्या सत्य…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X वापरकर्त्या JKYNC MAGAM ने त्याच्या हँडलवर व्हायरल पत्र शेअर केले.

येथे पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

https://archive.ph/YIeFX

इतर वापरकर्तेदेखील त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पत्र शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल पत्रावर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला जम्मू-काश्मीरचे भाजपा अध्यक्ष रवींद्र रैना यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट सापडली.

हे पत्र बनावट असून त्यांच्या कार्यालयातून असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”

आम्हाला भाजपाच्या जम्मू आणि काश्मीरच्या एक्स हँडलवर एक स्पष्टीकरणदेखील सापडले.

काश्मीर टुडेच्या फेसबुक पेजवरही असे कोणतेही पत्र पाठवण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.

आम्हाला ग्रेटर काश्मीरच्या वेबसाइटवर याबाबतची बातमी मिळाली.

https://www.greaterkashmir.com/kashmir/police-initiates-probe-into-circulation-of-fake-letter-in-bjp-leaders-name/

राजबाग पोलिस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदवण्यास कारणीभूत ठरलेल्या तक्रारीत रैनांच्या बनावट लेटरहेडवर बनावट पत्र तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

https://www.deccanherald.com/india/jammu-and-kashmir/jk-bjp-chief-terms-fake-an-order-asking-supporters-to-welcome-engineer-rashid-in-kashmir-3186373

आम्हाला आढळले की, भाजपाचे रवींद्र रैना यांचे लेटरहेड ऑनलाइन उपलब्ध आहे आणि त्यापैकी एक लेटर हेड अशाप्रकारे बनावट पत्र शेअर करण्यासाठी वापरण्यात आले होते.

निष्कर्ष : तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर भाजपाने बारामुल्लाचे खासदार शेख अब्दुल रशीद (इंजिनियर रशीद) यांना पाठिंबा देण्याचे पत्र जारी केले नाही, त्यामुळे व्हायरल झालेले पत्र बनावट आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jk bjp chief terms fake letter asking supporters to welcome engineer rashid in kashmir here the truth behind viral circular fact check