Company Sends Special Gift With Rejection Letter : नोकरीचा पेशा असणाऱ्या लोकांना माहितीय की, नोकरी शोधणं किती कठीण असतं. कंपनीमध्ये अनेकदा रिजेक्शनही केलं जातं. मात्र, एक व्यक्तीसोबत जे घडलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रिजेक्शन लेटरसोबत कंपनीने असं काही खास गिफ्ट पाठवलं, जे सर्वांना सांगितल्याशिवाय त्या व्यक्तीलाही चैन पडला नाही. कंपनीने दिलेलं भन्नाट गिफ्ट या व्यक्तीने रेडिटवर शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@mailvitch_Square नावाच्या यूजरने रेडिटवर २ फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, वास्तविकता हे पहिल्यांदाच घडलं आहे. कंपनीने रिजेक्शन लेटरसोबत मला एक अॅमेझॉन फूड कार्ड पाठवलं आहे. पहिल्या फोटोत एक गिफ्ट कार्ड आहे. ज्यावर ‘ए मूवी नाईट अॅट होम’ असं लिहिलं आहे. तर दुसरा फोटो कंपनीच्या रिजेक्शन लेटरचा आहे. परंतु, यामध्ये जे लिहिलं आहे, ते खूप प्रेरणादायी आहे.

नक्की वाचा – बापरे! जगातील सर्वात मोठा ससा पाहिलात का? कुत्र्याएवढा आकार…Video पाहून तुम्हीही डोकच धराल

पत्रात काय लिहिलंय?

कंपनीने नोकरीसाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचे आभार मानले. तसंच लेटरमध्ये लिहिलं की, तुमचा अनुभव आणि बॅकग्राऊंड पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. परंतु, एक विशिष्ट भूमिका आणि एका खास कारणामुळे आम्ही तुमची निवड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्या अर्जाचा विचार करत आहोत. तुमचं भविष्य उज्ज्वल राहण्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत. आमच्यासोबत नोकरी करण्यासाठी अर्ज केल्याने तुमचं पुन्हा एकदा आभार. आपण भविष्यात भेटू, अशी अपेक्षा. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, एखाद्याला रिजेक्ट करायचा ही खूप चांगली पद्धत आहे.