कोणताही सणवार आला किंवा काही विशेष गोष्ट आली तर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स देण्यात येतात. साहजिकच अनेकजण यावर तुटून पडतात. मात्र, खरेदीदारांची संख्या मोठी असल्याने एखादी गोष्ट बुक करूनही वेळेत लोकांपर्यंत पोहचत नाही. हीच गोष्ट आता रोजगार निर्मितीला चालना देणारी ठरली आहे. लोकांनी खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत वेळेपर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी या ऑनलाइन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ भरती केले जात आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीत वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या कंपन्यांच्या जॉब ऑफर्सचे प्रमाण यंदा २५ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १ लाख ३ हजार सीझनल नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

नवरीची साडी सांभाळण्यासाठी २५० विद्यार्थ्य़ांची फौज

या नोकऱ्या हंगामी स्वरुपाच्या असतील असे सुरूवातीलाच संबंधित कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातील अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे ४२ हजार नोकऱ्या आहेत. ‘फ्लिपकार्ट’च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘सेलच्या आधी फ्लिपकार्टने २० हजारपेक्षा अधिक लोकांना काम दिले आहे. ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू त्यांना वेळेत पोहचाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे या कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुलीला आयफोन घेण्यासाठी वडिलांनी गाठलं सिंगापूर

नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे रोजगारावर परिणाम झाला होता. मात्र, आता या कंपन्यांकडून प्रशिक्षित तरुणांना मागणी असल्याने बेरोजगारांसाठी काही प्रमाणात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टव्यतिरिक्त सॅमसंग, पेटीएम, मोबिक्विक आणि आदित्य बिर्ला मनी यांसारख्या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून तेथेही नोकरभरतीची प्रक्रिया सुरु आहे.

Story img Loader