पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 परिषदेच्या निमित्ताने इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या विविध देशांच्या प्रमुखांशी भेटीगाठी होत आहेत. या ठिकाणी जी ७ समूहातील सर्व राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित आहेत. एकीकडे सहभागी राष्ट्रांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत गंभीर चर्चा होत असताना दुसरीकडे काही विनोदी प्रसंगही घडताना दिसत आहेत. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे सर्वाधिकार हाती असलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याही बाबतीत असाच एक प्रसंग घडला असून त्यामुळे त्यांच्यावर मिश्किल टिप्पणीसह टीकाही केली जात आहे.

नेमकं घडलं काय?

जो बायडेन जी-७ परिषदेसाठी इटलीमध्ये दाखल झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने गुरुवारी अर्थात १३ जून रोजी इतर राष्ट्रप्रमुखांसंह परिषदेच्या ठिकाणी बाहेर मोकळ्या जागेत फोटोसेशन चालू होतं. यावेळी इतर सर्व राष्ट्रप्रमुख फोटोसाठी एकत्र उभे असताना नेमके त्याचवेळी जो बायडेन मात्र भलतीकडेच पाहात होते. एवढंच नाही तर ते उभ्या असलेल्या जागेवरून डावीकडे वळून काही अंतर चालतही गेले. नंतर त्या बाजूला तोंड करून ते उभे राहिले.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

जो बायडेन तिकडे तोंड करून उभे असताना इकडे इतर राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहात होते. त्यात यजमान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चॅन्सेलर ओलफ शोल्झ, युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन अशा दिग्गज नेत्यांचा समावेश होता!

https://x.com/SaltyGoat17/status/1801301576436302308

शेवटी जॉर्जिया यांनीच घेतला पुढाकार!

दरम्यान, फोटोसेशन व व्हिडीओ शूटकडे जो बायडेन यांचं लक्षच नसल्याचं पाहून शेवटी यजमान जॉर्जिया मेलोनी यांनीच पुढे जाऊन जो बायडेन यांना फोटोसेशनची जाणीव करून दिली. त्यानंतरही बायडेन काही पावलंच पुढे सरकले. शेवटी बाजूला उभे असलेले इतर नेते त्यांच्याकडे चालत गेले व त्यांच्या अवती-भवती फोटोसाठी उभे राहिले.

विश्लेषण : अमेरिकेच्या ‘फर्स्ट सन’ला तुरुंगात जावे लागणार?

ऐटीत घातला काळा चष्मा आणि फोटोसेशन संपन्न!

एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी जो बायडेन यांनी हातातला काळा गॉगल ऐटीत डोळ्यांवर चढवला. सगळे नेते त्यांच्या आजूबाजूला उभे राहिले आणि पुढचं फोटोसेशन पार पडलं. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर जशा मिश्किल प्रतिक्रिया येत आहेत, तशाच टीकात्मक पोस्टही दिसत आहेत.

https://x.com/CollinRugg/status/1798734255323066485

“हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तुम्ही कल्पना करू शकता का की या व्यक्तीने जागतिक नेत्यांसमोर आणखी काय काय केलं असेल? हे फारच लाजिरवाणं आहे”, अशी पोस्ट एका अमेरिकन नागरिकानं केली आहे.

तर एका अमेरिकन महिला लेखिकेने “हे ईश्वरा, अमेरिकेला मदत कर. आम्ही अवघड परिस्थितीत आहोत. अजून किती काळ हे या व्यक्तीला आम्हाला खजील करू देणार आहेत?” असा प्रश्न केला आहे.

अशाच प्रकारचे जो बायडेन यांचे आणखीही काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या इटली दौऱ्यातील महत्त्वाच्या विधानांबरोबरच त्यांच्याबाबतीत घडलेले हे प्रसंगही चर्चेचा विषय ठरले आहेत.