लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित एखादा व्हिडीओ समोर येतो तेव्हा तो वेगाने व्हायरल होते. सध्या असाच एक सुंदर हरणांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जॉगींगला येणारे आश्चर्यकारक दृश्याचे साक्षीदार झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हरणांचा मोठा कळप रस्ता ओलांडताना यामध्ये दिसत आहे, हे दृश्य कधीतरीच पाहायला मिळत असल्यानं प्रत्यक्ष उपस्थित लोकांनी याचा पुरेपूर आनंद घेतला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता, हरणांचा मोठा कळप संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रस्ता ओलांडत आहे. हे सगळे हरीण इतक्या वेगात उड्या मारत जात आहेत, की त्यांची संख्या मोजणेही कठीण होतं आहे. हा व्हिडिओ ४० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हे अप्रतिम दृश्य पाहून लोक मंत्रमुग्ध झाले. अनेकांनी संयम राखून हरणांना जाऊ दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. इतरांनी लिहिले की हा व्हिडिओ मानव आणि प्राणी यांच्यातील सुसंवादाचे उत्तम उदाहरण आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाकुत्र्याची ऐटीत गावभर ‘म्हैस राइड’; VIDEO पाहून म्हणाल…”हर कुत्ते का दिन आता है”

२ सेकंदात ओलांडला रस्ता

नेटकऱ्यांनी पाहिला असून सर्वांनीच या हरणाबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. कारण डोळ्यांची पाती लवते ना लवते तोच काही क्षणात हे हरीण इतकी लांब उडी मारून निघून गेलं. या हरणानं केवळ २ सेकंदात भलामोठा रस्ता पार केला. यावरून त्याच्या वेगाचा अंदाज आपल्याला येईल.