Vehicle Innovation Desi Jugaad Video : भारतात असे अनेक देसी जुगाड होत असतात ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. विशेषत: वाहनांच्या बाबतीत असे अनेक प्रयोग पाहायला मिळतात. यात अलीकडे काही तरुणांनी चक्क बाइकचे इंजिन आणि भंगारातील लोखंडी वस्तूंपासून एक अनोखी कार तयार केली आहे. जी आता अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. काही तरुणींनी मिळून केलेला हा देसी जुगाड एकदा पाहिला की तुम्ही तो पाहतचं राहाल. ही कार केवळ इको फ्रेंडलीच नाही तर त्यात चक्क सात जणांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देसी जुगाड की इनोव्हेशन?

हा व्हिडीओ नीरज (@being_happyyy) नावाच्या ट्विटरवर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, देसी जुगाड की देसी इनोव्हेशन? २९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन तरुण आणि दोन लहान मुलं जुगाडपासून बनवलेल्या अनोख्या कारवर बसून प्रवासाचा आनंद लुटत आहेत. ही कार अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे, ज्याचा विचार करु तुम्ही डोकचं धराल, एका कारच्या मॉडेलवरुन ही जुगाड कार बनवण्यात आल्याचे व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे. य कारमध्ये बाईकचे इंजिन बसवले आहे. त्याच वेळी स्टिअरिंगला चांगली डिझाइन देण्यात आली आहे. याशिवाय लाकूड, जुने टिन बसवून कारची बॉडी डिझाइन करण्यात आली आहे. भंगारातील लोखंडी वस्तूंपासून बनवलेली ही भारी कार पाहून तुम्हाला मजा येईल.

पण अपघाताची भीती…

२७ जुलै रोजी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ युजर्सच्या चांगलाच पसंतीस पडत आहेत. आत्तापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. मात्र अशा वाहनाने अपघात होण्याची भीती कायम आहे, असे असूनही भारतीयांचा जुगाड पाहून सोशल मीडियाचे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कमी खर्चात असा शोध लावणे प्रत्येकाच जमत नाही.