Jugaad to prevent theft: गेल्या अनेक वर्षांपासून चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. आधी चोर रात्री चोरी करायचे पण आता त्यांची हिंमत इतकी वाढलीय की दिवसाढवळ्याही कोणाला लुटायला ते मागेपुढे पाहत नाहीत.
कधी घरात शिरून धाक दाखवणाऱ्या कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, फोन चोरणाऱ्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. अशीच चोरी होऊ नये आणि चोर आपल्या घरात शिरला तरी त्याला चोरी करताच येऊ नये यासाठी एकाने भन्नाट जुगाड केलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लॉकरचा जुगाड
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका घरात एक छानसं असं कपाट दिसतंय. पण ते कपाट उघटताच त्याच्या आत कपडे, पैसे किंवा कसलीही मालमत्ता नसून चक्क टॉयलेट आहे. चोरासह सामान्य माणसालाही चकवेल असा जुगाड या घरातल्या लोकांनी केला आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला नक्कीच याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/reel/DATUKscSA4Y/?igsh=MXYzemdpYm5pYjdoNA%3D%3D
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @bagha_bagha_aamchach या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “चोरी करणारा चोर अजूनही डिप्रेशनमध्ये आहे” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला १.१ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
हेही वाचा… पेट्रोल पंपावर सीएनजी भरताना कारचा झाला स्फोट; पुढे ‘जे’ घडलं ‘ते’ धक्कादायक, पाहा थरारक VIDEO
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर हास्यास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अरे असे लोक येतात तरी कुठून?” तर दुसऱ्याने “आतून बाहेर कसं येणार” असा प्रश्न विचारत कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “बडे तेजस्वी लोग हैं…. ये जुगड सिर्फ यहा हो सकता है” तर “आत कडी नाही म्हणून गाणं गायचं” अशी कमेंट एकाने केली.