Viral Video : जुगाड म्हणजे निरुपयोगी गोष्टीपासून नवी उपयोगाची वस्तू तयार करणे आणि अडीअडचणीच्या वेळी त्या वस्तूचा वापर करणे. काही जुगाड खूप हटके असतात. सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे हटके जुगाड पाहून अनेकदा आपण थक्क होतो.
सध्या असाच एक जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्यासाठी एक भन्नाट जुगाड शोधला आहे. नेमका हा जुगाड काय आहे, आणि कशासाठी बनवला आहे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
हा व्हायरल व्हिडीओ एका शेतातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला जमीनीवर काही पोती पडलेली दिसेल. ही पोती ट्रकमध्ये ठेवायची आहे. त्यासाठी काही कामगार लोक हवी असणार पण या व्हिडीओमध्ये तुम्हाला कामगार दिसणार नाही तर एका अनोख्या जुगाडने पोती उचलून गाडीमध्ये भरली जात आहे.
काय आहे जुगाड?
शेतकरी हा आपल्या देशाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, अशी प्रत्येकाची इच्छा असते. शेतकऱ्यांची मेहनत कमी करण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करतात. नवनवीन टेक्नोलॉजीच्या मदतीने सहकार्य करतात. जर शेतकऱ्यांना पोती उचलायला कामगार भेटत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही हा जुगाड करू शकता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ट्रॅक्टर दिसेल. या ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मजबूत पाइप लावला आहे. या पाइपवर लोखंडी रॉड जोडला आहे. या रॉडच्या टोकाला हँगर लावला आहे. ट्रकच्या मदतीने ट्रॅक चालक हँगरमध्ये पोती उचलतो आणि गाडीमध्ये नेऊन टाकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. प्रत्येक शेतकऱ्याला हा माहिती असायला हवा, असे तुम्हाला कदाचित वाटू शकते. या व्हिडीओवर लिहिलेय, “पोते उचलायला कामगारच भेटत नव्हते. मग काय लावलं नियोजन”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
royal_shetkari__7.12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कसा आहे जुगाड मित्रांनो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यापेक्षा एक फळी लावून एकदाच 4 पोते टाकायचे” तर एका युजरने लिहिलेय, “टेक्नॉलॉजी” आणखी एका युजरने लिहिलेय, “शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड” अनेक युजर्सना हा जुगाड आवडलाय.