Phone Robbery Prevent Tip Video: सध्या जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकिटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो.
गर्दीत, ट्रेनमध्ये कधी अचानक आपला खिसा कापला जातो आणि फोन लंपास केला जातो हे कळता कळत नाही. खिशात फोन कितीही सुरक्षित ठेवला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे चोर आपलं काम चोख करतात आणि लोकांचे मोबाईल पळवतात. आता अशा चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि आपला फोन वाचवण्यासाठी एका काकांनी जबरदस्त जुगाड शोधून आणला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमका असा काय जुगड केलाय काकांनी जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (How to Keep Mobile Safe From Robbery)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, मुंबईच्या लोकलमध्ये एक माणूस बसलाय. आणि चोरांपासून सावध राहण्यासाठी आणि आपला फोन चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी त्याने एक भन्नाट जुगाड केल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमध्ये दिसून येतंय की, या माणसाने त्याचा फोन चक्क एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवला आहे. फोन वापरून झाला की, डब्याचं झाकण लावून तो हा फोन त्याच्या बॅगेमध्ये ठेवताना दिसतोय. यामुळे चोरांना खिसा कापूनही फोन सापडणार नाही असा जुगाड या काकांनी केल्याचं दिसून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @ram_koli1983 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ट्रेनमध्ये मोबाईल चोरांपासून सुरक्षित ठेवण्याची नवी पद्धत अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ७० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, जर हा टिफिन बॉक्सच चोरी झाला तर. तर दुसऱ्याने “वाह्ह, कमाल आयडिया “अशी कमेंट केली.