Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांचे शाळेतील व्हिडीओ नेहमीच चर्चेत येत असतात. कधी लहान मुलांचे हसतानाचे तर कधी रडतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुले गाताना दिसतात तर कधी लहान मुले डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेचे विद्यार्थी असलेले लहान मुले सुंदर पोशाखात दिसत आहे. विशेष म्हणजे हा पोशाख वृत्तपत्रांपासून बनवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

भारतात जुगाडची कुठेही कमतरता भासत नाही. क्रिएटिव्हीटी वापरुन जुन्या वस्तूंपासून नवनवीन गोष्टी बनवल्या जातात. या व्हिडीओमध्ये सुद्धा जुन्या वस्तूंचा वापर करुन सुंदर पोशाख बनवले आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुलांनी जुन्या वृत्तपत्रांपासून बनवलेले सुंदर पोशाख घातले आहे. एकही पैसा खर्च न करता हा पोशाख बनवला आहे. अनेकदा वृत्तपत्रे दिवस गेल्यावर फेकून देतो किंवा रद्दी म्हणून विकतो पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या जुन्या वृत्तपत्राचे महत्त्व कळेल.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला काही मुले आणि मुली दिसतील. त्यांनी शाळेचा गणवेश घातला आहे. हा व्हिडीओ एका वर्गातील आहे. त्यांच्या गणवेशावर त्यांनी वृत्तपत्रांपासून बनवलेला सुंदर पोशाख घातला आहे. क्रिएटिव्हीटी दाखवत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या डिझाइनचा पोशाख बनवला आहे. या डिझाइन्स खूप अप्रतिम दिसताहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्या क्रिएटिव्हीटीचे खूप कौतुक कराल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Teacher surprise class XII students
१२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेने दिला खास निरोप; डोळ्यांत पाणी आणेल इतका सुंदर क्षण; VIDEO चा चुकूनही चुकवू नका शेवट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Grandmother dance on marathi song Khanderayachya Lagnala Banu Navri Natali video goes viral
VIDEO: “खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली…” भर कार्यक्रमात नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स
Shocking video of two female students did weird act in government school viral video on social media
अचानक वर्गातून उड्या मारल्या आणि मैदानात लोळू लागल्या, सरकारी शाळेत विद्यार्थीनींचं विचित्र कृत्य! VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
Gas cylinder empty mistake gas stove catches fire shocking video viral on social media
महिलांनो तुम्हीही गॅस सिलिंडर संपल्यावर असंच करता का? किचनमधली ‘ही’ चूक बेतेल जीवावर, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

हेही वाचा : “आई आपल्याबरोबर किती दिवस आहे, कुणास ठाऊक…” स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले भावनिक पत्र

arasupalli या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान बनविले” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक शाळेत असे प्रयोग करायला पाहिजे” अनेक युजर्सनी त्यांना व्हिडीओतील सर्वात जास्त कोणती डिझाइन आवडली, ते सुद्धा सांगितले आहेत.”

Story img Loader