Jugaad Video : गेल्या महिन्याभरापासून कडक उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणेदेखील अवघड होत आहे. पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना उन्हाच्या झळा सोसत काम करावे लागत आहे. पण उन्हापासून वाचण्यासाठी काही जण वेगवेगळी शक्कल लढवत असतात. यात जुगाड करणाऱ्यांची आपल्या देशात कमतरता नाही. कुठे, कधी, काय वापरून लोक असा जुगाड तयार करत असतात, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. परिस्थिती पाहून लोक नवनवीन जुगाड ट्राय करत असतात. अशात एका जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एका वृद्ध व्यक्तीने ऊन-पावसापासून वाचण्यासाठी सायकलवर एक लाकडी छत तयार केले आहे. जे पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक काका भर उन्हात सायकल घेऊन आरामात जाताना दिसत आहेत. पण, त्यांनी सायकलच्या वर आणि आजूबाजूला एक हलके-फुलके लाकडी छत तयार केले आहे. ज्यामुळे केवळ उन्हापासूनच नाही तर पावसापासूनही काकांचा बचाव होणार आहे. काकांचा ऊन आणि पावसापासून वाचण्याचा हा देसी जुगाड आता अनेकांना आवडला आहे.
काकांचा देसी जुगाड व्हिडीओ
हा देसी जुगाड पाहून तुम्हालाही क्षणभर धक्का बसला असेल. तुम्ही विचार करत असाल की, काकांना हा जुगाड सुचला कसा असेल? पण काकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. technology_world_09′ नावाच्या इन्स्टाग्रामवर पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर जुगाडच्या या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेक युजर्स काकांची प्रशंसा करत आहेत, तर काही युजर्स काकांची मजा घेत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘चाचा, तुसी ग्रेट हो.’ काही युजर्सनी म्हटले आहे की, ‘लोकांच्या मनात अशा कल्पना येतात कुठून?’ या देसी जुगाडवर तुमची प्रतिक्रिया काय आहे, हे आम्हाला कमेंट करून सांगा.