Jugaad Viral Video : आपल्या देशात शेतकरी आणि मजूर वर्गाची संख्या अधिक आहे. त्यांच्या वाटेला येणारे कष्ट हे मोजता न येणारे असतात. तुम्ही अनेकदा मजूर लोकांना डोक्यावर लोखंडी टोपलीमध्ये माती वाहून नेताना पाहिले असेल. त्यांचे कष्ट पाहून अनेकदा आपल्याला त्यांची दया येते पण एका तरुणाने मजूर लोकांचा हा त्रास पाहून एक जुगाड शोधून काढला आहे. तरुणाचा हा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (jugaad viral video a young guy find out amazing jugaad for head load workers)
काय आहे जुगाड?
या तरुणाने मजूरांचा त्रास कमी करण्यासाठी एक स्टँड बनवला आहे. हा स्टँड खांद्यावर ठेवायचा आणि त्या स्टँडवर मातीने भरलेली लोखंडी टोपली ठेवायची. जेणेकरून डोक्यावरून लोखंडी टोपली वाहून नेण्याची आवश्यकता नाही. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या स्टँडचा कसा उपयोग करायचा, हे तरुण करून दाखवत आहे. स्टँड पडू नये म्हणून तरुणाने पोटाला धरून बेल्ट सुद्धा लावला आहे. विशेष म्हणजे सुरक्षा जपत हा स्टँड बनवला आहे. या जुगाडचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ ( Viral Video)
shajapur_mandi_bhav या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जुगाड” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान जुगाड आहे मजूरांसाठी” तर एका युजरने लिहिलेय, ” खांद्यावर कापूस लावा, जेणेकरून त्यावर भार पडणार नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मजूरांसाठी भन्नाट जुगाड आहे. त्यांचा त्रास कमी होणार” अनेक युजर्सना हा जुगाड आवडला आहे तर काही युजर्सना मात्र हा जुगाड आवडला नाही.
यापूर्वी सुद्धा असे अनेक भन्नाट जुगाड व्हायरल झाले आहेत. काही जुगाड मजेशीर असतात तर काही जुगाड थक्क करणारे असतात पण हा जुगाड खूप हटके आहे. लोक त्यांच्या क्रिएटिव्हीटीचा वापर करून नवनवीन जुगाड शोधताना दिसतात.