Jugaad Video: सोशल मीडियावर केव्हा कधी काय व्हायरल होईल याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या विषय म्हणजे लोकांचे अतरंगी आणि देशी जुगाड. कोणी कारपासून हेलिकॉप्टर तयार करतो, तर कोणी वीट वापरून कुलर तयार करतो. आता असाच एक नवीन जुगाड समोर आला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने असा अफालातून जुगाड केला आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती व्हिडिओ पाहून थक्क होत आहे.
व्हिडिओमध्ये वयस्कर व्यक्ती रस्त्यावरून सायकल चालविताना दिसत आहे. पण ही सायकल काही साधी सायकल नसून तर जुगाड करून तयार केलेली आगळी-वेगळी सायकल आहे.व्हिडिओ हून लोक बुचकळ्यात पडत आहे की ही सायकल बनवली कशी केली?केली तर केली हा माणून सायकलवर चढला कसा आणि अशी विचित्र सायकल या व्यक्तीला चालवता कशी येतेय? काय आहे सायकलचा जुगाड चला जाणून घेऊ या सविस्तर
जुगाडू आजोबांनी चालवली डबल डेकर सायकल
आतापर्यंत तुम्ही डबल डेकर बस पाहिली असेल पण आता डबल डेकर सायकल पण आली आहे. होय तुम्हाला विश्वास बसत नसेल पण ही सायकल खरचं डबल डेकर आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती अशी सायकल चालवत आहे जी एकावर एक असल्यासारखी दिसतेय म्हणून तुम्ही तिला डबल डेकर सायकल म्हणून शकता. या व्हिडिओ ट्विटरवर एका अधिकाऱ्याने शेअर केला आहे, ज्यामध्ये एक आजोबा डबल डेकर सायकल चालवताना दिसत आहे. ही सामान्य सायकलपेक्षा उचांवर असूनही हा व्यक्ती अगदी सहज ही सायकल चालवताना दिसत आहे. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय तो म्हणजे, अखेर या सायकलवरून आजोबा खाली उतरणार कसे?
व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या मजेशीर प्रतीक्रिया
व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की ही सायकल जुगाड वापरून तयार केली आहे ज्यामध्ये सामान्य सायकलवर अॅटलसची फ्रेम कापून जोडली आहे सायकलच्या हँडलच्या ऐवजी कारची स्टेअरिंग लवाली आहे व्हिडिओ ट्विटरवर कलेक्टर संजय कुमार यांनी शेअर केला आहे. त्यासोबत लोकांनी या व्हिडिओला कॅप्शन काय देऊ असे विचारले आहे. एका यूजरने विचारले की,”आजोबा, वर चढले कसे?”दुसऱ्याने म्हटले की, ”जर आजोबांना ब्रेक लावायचा असेल तर बॅलन्स कसे करणार?”तर तिसरा म्हणाला की, ”आजोबा यावरून उतरून दाखवा मग मानलं”