Desi jugad Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.दरम्यान एका तरुणानं चोरांपासून घराचं संरक्षण करण्यासाठी असाच एक भन्नाट जुगाड दाखवला आहे. हा जुगाड तुम्ही केला तर तुमच्याही घरी कधीच चोरी होणार नाही.
घराची सुरक्षा प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. तसे, बहुतेक लोक दार बंद करण्यापासून अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देण्यापर्यंत सर्व सुरक्षा व्यवस्था ठेवतात. असे असतानाही काहींच्या निष्काळजीपणामुळे अनेकवेळा घरांमध्ये चोरीच्या घटना घडतात. विशेषत: काही भागात लोकांमध्ये अनेकदा चोरीची भीती असते. अशा परिस्थितीत घर सुरक्षित ठेवण्यासाठी काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. अशातच या तरुणानं दाखवलेली आयडीया पाहून तुम्हीही कौतुक कराल.
तुमच्या परिसरात यापूर्वी चोरी झालेली असो किंवा नसो. चोर-दरोडेखोर आपल्या घरावर कधीही हल्ला करू शकतात, असा अंदाज ठेवून आपण नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. काही सोप्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची सुरक्षा तर वाढवू शकताच पण घरात चोरांचा कायमचा प्रवेश होणार नाही याचीही तजवीज करू शकता.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काहीही खर्च न करता तुम्ही घराची सुरक्षितता संभाळू शकता किंवा चोरांना रंगेहात पकडू शकता. यावेळी या तरुणानं दरवाजा बंद करुन दरावाच्या चौकटीला आतल्या बाजूनं एक खिळा ठोकला आहे आणि त्याला एक भांडं अडकवलं आहे. जेणेकरुन जेव्हा दरवाजा उघडेल तेव्हा त्या भांड्याला धक्का लागेल आणि ते भांडं खाली पडेल. यावेळी आवाज होताच सगळे सतर्क होतील. चोरटे बळजबरीने घरात घुसतात. अशा परिस्थितीत तुम्ही घराच्या मुख्य गेटवर सुरक्षा अलार्म लावू शकता. ज्याच्या मदतीने घरात चोर किंवा अज्ञात व्यक्ती आल्याची माहिती तुम्हाला लगेच कळेल. मात्र आता खर्च न करताही तुम्ही घरच्या घरी अशाप्रकारे जुगाड करु शकता.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर 5x_rohit_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून तरुणाचं कौतुक करत आहेत.