Viral Photo: सरकारनं प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली असतानाही आपल्या आजू-बाजूला लोक सर्रास प्लॅस्टिकचा वापर करताना दिसतात. प्लॅस्टिक उत्पादनांच्या वापरामुळे जैवविघटन न होणा-या कचऱ्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय पर्यावरणासाठीही ते प्रचंड घातक असल्याचं सिद्ध झालंय. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी अनेक कंपन्या, दुकानदार प्रयत्न करत असतात. काही दुकानदार ग्राहकांना घरुनच कापडी पिशवी आणण्याचा पर्याय सुचवतात तर काही पेपरमध्ये ग्राहकांना सामान बांधून देतात. प्रत्येकजण प्लॅस्टिकच्या वापर टाळण्यासाठी पर्याय शोधत असतो. अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांसाठी पर्यावरण पूरक पर्याय घेऊन पुढे येत असतात. अशातच सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोवरुन प्लॅस्टिकच्या वापराबाबतची जनजागृती चांगलीच फसल्याचं दिसत आहे. एका कंपनीनं प्लॅस्टिक जनजागृती करण्याच्या नादात स्वत:चंच हसं करुन घेतल्याचा प्रकार समोर आलाय.

कंपनीनं करुन घेतलं स्वत:चंच हसं

उन्हाळ्याच्या दिवसांत बरेच जण शहाळ्याचं पाणी पिताना प्लॅस्टिकच्या स्ट्रॉचा वापर करतात. पाणी पिण्यासाठी वापरली जाणारी स्ट्रॉ ही सुद्धा प्लॅस्टिकचीच बनलेली असते. मात्र यामुळे आपल्या आरोग्याचे अनेक प्रकारे नुकास होऊ शकते. प्लास्टिकच्या गोष्टी या अनेक हानिकारक केमिकल्सनी बनलेल्या असतात. यामुळेच आता प्लॅस्टिकचा वापर करताना आपण विचार करतो. आता कंपन्याही त्यांच्या उत्पदाकांमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळतात, त्याचप्रमाणे आता कोल्डड्रिंक्सचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीही कोल्डड्रिंक्ससोबत देणाऱ्या स्ट्रॉ या कागदी स्वरुपाच्या आणल्या आहेत.

आधी पेप्सी, फ्रूटी यांसारख्या सॉफ्टड्रिंक, कोल्डड्रिंक्ससोबत प्लॅस्टिकचे स्ट्रॉ दिले जायचे मात्र प्लॅस्टिकवर बंदी घातल्यानंतर कपंन्यांनी कागदी स्ट्रॉ देण्यास सुरुवात केलीय. प्लॅस्टिक बंदच्या उपक्रमात अनेक कंपन्या पुढे येत आहेत.. दरम्यान एका कंपनीचा हाच प्रयत्न फसल्याचं समोर आलंय. या कंपनीनं स्ट्रॉ तर कागदाचा दिला मात्र स्ट्रॉला केलेलं रॅप मात्र प्लॅस्टिकचंच दिलं. यावरुन कंपनीनं स्वत:चंच हसं करुन घेतलंय. सोशल मीडियावरही हा फोटो व्हायरल होतोय.

हे ही वाचा<< Video: हत्तीनं फुटबॉलसारखी उडवली स्कूटर, भर बाजारात सैरावैरा पळू लागले लोक अन् तितक्यात…

या कंपनीनं स्ट्रॉ तर कागदाचा दिलामात्र प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये दिल्यानं ते ट्रोल झाले. हा फोटो आत्तापर्यंत 8 लाख लोकांपर्यंत पोहचला असून 20 हजारांपेक्षा जास्त लाईक या फोटोला मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी अनेक गमतीशीर प्रतिक्रियाही यावर दिल्या आहेत. तर काहींनी प्लॅस्टिकचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केलीय.

Story img Loader