गुरुपौर्णिमेच्या दिवस खगोलप्रेमींसाठी खूप खास असणार आहे कारण आज ‘सुपरमून’ दिसणार आहे. आज सर्वांना मोठा आणि अधिक प्रकाशमान चंद्र पाहण्याची संधी मिळणार आहे. आज वर्षातील सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे असे मानले जात आहे. यंदा पुढील वर्षभरात ३० ऑगस्ट, १ ऑगस्ट आणि २९ सप्टेंबर रोजी ‘सूपरमून’ दिसणार आहे.
‘सुपरमून’ म्हणजे काय?
‘सूपरमून’ ही एक खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा पृथ्वी आणि चंद्राचे अंतर कमी असते तेव्हा आपल्याला ‘सूपरमून’ दिसतो. पृथ्वी आणि चंद्राचे सरासरी अंतर हे ३८४,४०० किमी असते पण ‘सुपरमून’ ज्या दिवशी दिसणार त्या दिवशी हे अंतर जवळपास ३७०,००० किमी असते. त्यामुळे आपल्याला ‘सुपरमून’ पाहता येतो.
हेही वाचा : Viral Video : एक वर्षाच्या चिमुकल्याने केली २४ सेकंदापर्यंत डेड हँगिंग एक्सरसाइज, पाहा व्हिडीओ
‘सुपरमून’ कसा पाहता येईल?
‘सुपरमून’ तुम्ही थेट पाहू शकता पण तुम्हाला खूप जवळून चंद्र पाहायचा असेल तर तुम्ही दुर्बिणीचा वापर करू शकता. खगोलशास्त्रानुसार जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा समुद्राला भरती येणे किंवा वादळ येणे, अशा घटना घडू शकतात.
किती वाजता दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद्र?
आज चंद्रोदय १९:२७ वाजता तर चंद्रास्त ४:४७ मिनिटांनी होणार आहे. तुम्ही या कालावधीत वर्षातील सर्वात मोठा चंद्र सुपरमून पाहू शकता.