विचित्र स्टंट करणे एखाद्या व्यक्तीला महागात पडल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या अशाच एका व्यक्तीला जहाजामधून उडी मारणं त्याच्या जीवावर बेतल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण समुद्रात असा स्टंट करताना खूप विचार करतील यात शंका नाही.

स्टंटपायी गेला जीव –

afzal__150k नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काटा येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने जहाजातून समुद्रात जबरदस्त उडी मारल्याचं दिसत आहे. पण हा स्टंट त्याला एवढा महागात पडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. कारण तो व्यक्ती जहाजातून खाली उडी मारताच एक भलामोठा शार्क त्याला वरच्यावर गिळतो, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- सिंहापासून वाचण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडत होतं माकड तितक्यात…, मन हेलावणारा Video व्हायरल

हेही पाहा- Video: वहिनीच्या प्रेमात पडला, गावकऱ्यांसमोर द्यावी लागली ‘अग्निपरीक्षा’; निखाऱ्यात हात घातला अन्…

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत, एक व्यक्ती समुद्रात असणाऱ्या जहाजातून समुद्रात उडी मारतो. पण तो पाण्यात पडायच्या आधीच एका भलामोठा शार्क त्याला हवेतच पकडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा फिल्मी सीन असल्याचं म्हटलं आहे. मात्र, काहींनी हा व्हिडीओ अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक असून असे भलते स्टंट कोणीही करु नये असंही म्हटलं आहे.

Story img Loader