Visitor Throws Plastic Bag In Hippos Mouth : जंंगल सफारी हा खूप थ्रीलिंग अनुभव असतो. या जंगल सफारीदरम्यान वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. पण, जंगलात फिरायला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे असते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जंगलात फिरताना वन्यप्राण्यांना त्रास न देणे, दुसरी गोष्ट म्हणजे जंगल सफारीदरम्यान पार्क प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे. मात्र, काही पर्यटक सर्व नियम धाब्यावर बसवीत जंगल सफारी करताना दिसतात. अशाच प्रकारे काही पर्यटक जंगल सफारीसाठी गेले होते. यावेळी एका पर्यटकाने मस्करीत पाणघोड्याच्या (Hippo) तोंडावर प्लास्टिकची पिशवी फेकली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पर्यटकाने हरणालाही फेकून मारले गाजर (Safari Goer Throws Plastic Bag In Hippo’s Mouth)

अनेक युजर्सनी या घटनेसाठी जबाबदार व्यक्तीला अटक करण्याचे आवाहन केले आहे. ही घटना इंडोनेशियातील तमन जंगल सफारीदरम्यान घडली. असा दावा केला जात आहे की, सफारीदरम्यान पर्यटकाने एका हरणालाही गाजर फेकून मारले होते. त्यानंतर पाणघोड्याच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी फेकली.

young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्या उतरत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
girl weird dancing on mumbai local railway platform video viral
“ही मुंबईचं नाव खराब करतेय”, रेल्वेस्थानकावरील तरुणीचा विचित्र डान्स VIDEO पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, “वेडेपणा…”
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Pune People Are You Planning To Visit Tamhini Ghat This Weekend Wait First Watch This Video
ताम्हिणी घाटात बाईक घेऊन जाण्याआधी ‘हा’ VIDEO पाहा; रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांचं काय झालं बघाच
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक पाणघोडा (Hippo plastic bag incident) एका तलावाच्या काठावर तोंड उघडून उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी एक पर्यटक कारमधून येतो आणि पाणघोड्याजवळ येऊन थांबतो. यावेळी तो तोंड उघडून उभ्या असलेल्या पाणघोड्याला गाजर खायला घालण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरा प्रवासी त्याच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी टाकतो, जी तो खाणे समजून चघळू लागतो.

More Stories Of Viral Video : एकमेकांचे कपडे पकडले मग बुक्के मारून…; मेट्रोत दोन पुरुषांची हाणामारी; VIDEO व्हायरल

या पार्कचे प्रवक्ते अलेक्झांडर झुल्करनैन यांनी जकार्ता ग्लोबला सांगितले की, आम्ही त्या व्यक्तींच्या वाहनाची लायसन्स प्लेट ओळखली आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणी जाहीरपणे माफी मागावी, असे आवाहन आम्ही करतो; जेणेकरून इतर पर्यटक इंडोनेशियन सफारी पार्कमध्ये येताना नियमांचे पालन करतील. या प्राण्याची ताबडतोब तपासणी करण्यात आली असून, तो आरोग्यदृष्ट्या व्यवस्थित असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत.

“व्यक्तीला अटक होईल अशी आशा” युजर्सच्या कमेंट्स

एका युजरने कमेंट केली की, मला आशा आहे की माणूस आणि पाणघोडा यांची पुन्हा कधीतरी भेट होईल. तसेच पाणघोड्याला अधिक अनुकूल वातावरण मिळेल, अशी आशा आहे. दुसरा युजर म्हणाला की, मी पाहिलेल्या इतर कोणत्याही व्हिडीओपेक्षा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला जास्त राग आला. तिसऱ्या युजरने लिहिले की, ती व्यक्ती पकडली जाईल आणि त्याला अटक होईल, अशी आशा आहे. त्यामुळे पाणघोड्याचा मृत्यू होऊ शकतो. आणखी एक युजर म्हणाला की, अशा लोकांना प्रत्येक सफारी पार्कमध्ये बंदी घातली पाहिजे आणि त्यांना कोणत्याही प्राण्याजवळ जाऊ देऊ नये. शेवटी एका युजरने लिहिले की, व्वा! आपण कासवांचा जीव घेण्यापासून ते पाणघोड्यांचा जीव घेण्यापर्यंत पोहोचलो आहोत.