जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर हा विषय मागील काही काळापासून नेहमीच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मानव आणि जंगली प्राण्यांच्या संघर्षाचा मुद्दा या दोन्ही जिल्ह्चांमध्ये दिवसोंदिवस गंभीर विषय ठरत आहे. अनेकदा बिबट्या पाहिल्याच्या घटना या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वरच्या वर घडत असतात. काही ठिकाणी बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्याची उदाहरण आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये जुन्नरमध्ये एका बिबट्याचं पिल्लू आढळून आल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे एका छोट्या मांजरीच्या आकाराचं हे पिल्लू व्हिडीओ शूट करणाऱ्यावर गुरगुरताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सह्याद्री माऊंटरिंग ऑर्गनायझेशन या जुन्नरमधील नोंदणीकृत संस्थेच्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्याचं पिल्लू शेताच्या बांधावरुन चालताना दिसत आहे. शूटींग करणाऱ्या व्यक्ती या पिल्लांचं चित्रिकरण करत असताना जवळ जाऊन चित्रिकरण करत होते. त्याचवेळी या पिल्लू अगदी जोर लावत गुरगुरल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या पिल्लाची ही मूर्ती लहान किर्ती महान पद्धतीची ही डरकाळी वजा गुरगुर पाहून व्हिडीओ शूट करणारेच काही पावलं मागे सरकले.”

“शेवटी बिबट्याचच पिल्लू गुरकल्याशिवाय रहाणार नाही. देशातील सर्वाधिक बिबटे असलेल्या जुन्नर (जि.पुणे) तालुक्यात मानवी वस्तीत आलेल बिबट्याच पिल्लू,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करुन नक्की कळवा.