T20 World Cup 2024 : ICC T20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 दरम्यान प्रेक्षक आणि नेटकऱ्यांच्या टीकेचा (ट्रोलिंगचा) सामना त्याला करावा लागला होता. पण, आज हार्दिक पांड्याचे सर्वत्र भरभरून कौतुक केले जात आहे. विश्वचषकातील भारताच्या मोठ्या विजयानंतर त्याने सोशल मीडियावर बालपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण वयातील पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये किशोरवयीन पांड्या म्हणतो, “हम दोनों का एक ही सपना है की, हम दोनो भी बडोदा और इंडिया के लिए खेलें (आम्हा दोघांचे स्वप्न आहे की, आम्हाला दोघांनाही बडोदा आणि भारतासाठी खेळायचे आहे),” किशोरवयात पांड्याने जे स्वप्न पाहिले, ते आज पूर्ण केले.

ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं

व्हिडीओ जसजसा पुढे जात असताना बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पांड्या त्याच्या हातात तिरंगा घेऊन, त्याच्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहे. त्यानंतर ऋषभ त्याच्याकडे T20 विश्वचषक ट्रॉफी देतो. पार्श्वभूमीवर अरिजित सिंगच्या आवाजातील ‘लहरा दो’ गाणे ऐकू येते.

“बडोद्यातील एक मुलगा फक्त त्याचे स्वप्न जगत आहे आणि त्याच्या वाटेत आलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तो कृतज्ञ आहे. आणखी काही मागू शकत नाही. माझ्या देशासाठी खेळणे हा नेहमीच सर्वांत मोठा सन्मान असेल,” अशी कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिली आहे.

हेही वाचा –‘गणपत्ती बाप्पा मोरया!’ न्यूयॉर्कमध्ये चाहत्याचा जल्लोष; भारताच्या ऐतिहासिक T20 World Cup 2024 विजयाचा आनंद साजरा

हेही वाचा – Pune : भारताच्या विजयानंतर पुण्यात चालत्या PMT बसवर उभे राहून तरुणांनी केला डान्स, FC रोडवरील Video Viral

या व्हिडीओला प्लॅटफॉर्मवर १.४ दशलक्षाहून अधिक व्ह्युज मिळाल्या. कारण- क्रिकेट चाहत्यांनी पांड्याचे त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल कौतुक केले.

“वेळेची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे ती बदलते. दोन महिन्यांपूर्वी आयपीएलदरम्यान सर्वांनी तुला ट्रोल केले होते. आता तू राष्ट्रीय नायक (National Hero) आहेस”, असे एकाने कमेंटमध्ये लिहिले.

“खेळात आणि आयुष्यात पुनरागमन कसे करायचे ते तू दाखवले आहेस. काय क्षण आहे. धन्यवाद भाऊ,” असे दुसऱ्याने लिहिले

“मेहनतीने द्वेषाचे प्रेमात रूपांतर कसे होऊ शकते हे पाहून आनंद झाला. काही महिन्यांपूर्वी तुम्हाला ट्रोल केले गेले होते; परंतु आज तुम्ही आम्हाला जिंकले. बडोद्यापासून जगापर्यंत”, असे तिसऱ्याने लिहिले.