यूएईची राजधानी दुबई येथे आयोजित हवामान बदलावरील COP-28 शिखर परिषदेत जगभरातील नेते पोहोचले. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही पोहोचले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींबरोबर एक सेल्फी घेतला, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत.
इटलीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. पोस्टवरील कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘COP-28 मधील चांगली मैत्री #Melody.’ इटलीच्या पंतप्रधानांनी मोदी आणि मेलोनी ही दोघांची आडनावं एकत्र करून हॅशटॅग #Melody तयार केला आहे, ज्याला सोशल मीडिया युजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. विशेषत: एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) #Melody चांगलाच ट्रेंड होताना दिसत आहे. अनेक युजर्स आता #Melody ट्रेंड वापरत मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर तर #Melody वरून मीम्सचा महापूर आला आहे.
एक्सवर #Melody चा ट्रेंड
अनेक युजर्सनी एक्सवर पीएम मोदी आणि इटलीच्या पीएम मेलोनी यांचा हसतानाचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ट्रेंडिंग, मजेशीर ‘जस्ट लुकिंग लाइक अ वॉव’ डायलॉग वापरला आहे.
दरम्यान, काही युजर्सनी पीएम मोदी आणि मेलोनी यांनी परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यांवरूनही कमेंट्स करत त्याला ‘सेल्फी ऑफ द इयर’ असं म्हटले आहे.
तर काहींनी दोघांच्या या सेल्फीचे वर्णन करण्यासाठी बॉलिवूड चित्रपटांमधील लोकप्रिय संवाद वापरले.
दरम्यान, राजकीय टीकाकारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या इटली कनेक्शनवर टीका करत, An Italian for an Italian…ला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पीएम मोदींनी मेलोनी यांना त्यांच्या २०२४ च्या लोकसभा प्रचारासाठी भारतात आमंत्रित करावे, असे सुचवले आहे.
दरम्यान, COP-28 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांच्या फोटोशूटमध्ये पीएम मोदी आणि जॉर्जिया मेलोनी एकमेकांशी बोलताना आणि हसताना दिसले, त्याचा हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही महिन्यांतील ही तिसरी भेट आहे. जॉर्जिया या वर्षी सप्टेंबरमध्ये G20 परिषदेसाठी भारतात आल्या होत्या. यावेळी त्यांनी G20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. मार्चच्या सुरुवातीला मेलोनी आठव्या रायसिना डायलॉग २०२३ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून भाग घेण्यासाठी भारतात आल्या होत्या. यावेळीही त्यांचे पीएम मोदींसोबतचे चांगले बॉन्डिंग पाहायला मिळाले.