Viral video: सध्या सोशल मीडियावर ‘जस्ट लुकिंग लाइक अ वाव’ हा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड तुफान गाजत असून प्रत्येकजण त्यावर वेगवेगळ्या रिल्स बनवत आहे. लोकांनाही हे व्हिडिओ खूप आवडत आहेत. याच ट्रेंडचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण या गाण्याचा ट्रेंड आता चक्क एका मांजरीनं फॉलो केला आहे. ‘जस्ट लुकिंग लाइक अ वाव’ म्हणत या मांजरीनं चक्क रिल्सही केली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

मांजरीनंही फॉलो केला सुपरहिट ट्रेंड

या व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या मांजरीसोबत रील बनवत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा मालक म्हणतो ‘सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट…जस्ट लुकिंग लाइक अ….त्यानंतर ही मांजर वाव असं म्हणतेय.. लोकांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटत आहे. हा व्हिडिओ सर्वप्रथम जास्मिन कौर नावाच्या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यांचं दिल्लीत कपड्यांचा स्टुडिओ आहे. हा व्हिडिओ ९ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच सोशल मीडियावर आला होता.

VIDEO पाहून म्हणाल खरंच वाव…

वास्तविक हा एक प्रमोशनल व्हिडिओ होता, ज्याची क्लिप व्हायरल झाली होती. हा आवाज सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला की प्रत्येकजण त्यावर आपापले व्हिडिओ बनवून पोस्ट करू लागला. तेसच या ट्रेंडवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्हिडिओ बनवले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, हा मांजरीचाही व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पहा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अरे आवरा हिला! नव्या नवरीचा नातेवाईकांसमोर तुफान डान्स; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘खूपच अप्रतिम व्हिडिओ. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूप सुंदर.’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘खूप मजेदार व्हिडिओ.’

Story img Loader